घटना तज्ञ सुभाष वारे यांचे मत; संघराज्यालाच धोका, जनसुरक्षा विधेयक जनविरोधी कराड/प्रतिनिधी : – राज्यातील महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे रोजगार आणि औद्योगिक दृष्ट्या विकास करण्यासाठी विचार होण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. याउलट नको त्या गोष्टींना पाठिंबा देऊन वातावरण बिघडण्याचे काम केले जात आहे. ते न थांबल्यास ही परिस्थिती महायुतीवर बुमरँग होऊ शकते, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, घटना तज्ञ सुभाष वारे यांनी केली. पत्रकार परिषद : येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात सुभाष वारे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाटगे उपस्थिती होते. हा कारभार राज्याला मागे नेणारा : राज्यामध्ये महायुतीला मिळालेले मताधिक्यच त्यांच्या वागण्यातील बदलाला कारणीभूत आहे, असे सांगताना श्री. वारे म्हणाले, मोठे मताधिक्य मिळाले म्हणजे सगळ्यांना घरी घेऊन चाललेला कारभार राज्याला मागे नेणारा आहे. बहुमताच्या जीवावर रोजगाराचे