कराड येथील महंमद रफी म्युझिक अॅकॅडमी यांच्या वतीने राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती अॅकॅडमीचे महागुरू असिफ बागवान यांनी दिली आहे.
रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह : कराड येथील अर्बन शताब्दी हॉल येथे सकाळी 10 वाजता स्पर्धा सुरू होईल. प्रथम विजेत्यास 5 हजार, व्दितीय 3 हजार, तृतिय 2 हजार व चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी 1 हजार रूपये रोख, तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
निवडीचे निकष : दोन राउंडमध्ये स्पर्धा होणार असून पहिल्या राउंडमधून पहिल्या दहा स्पर्धकांना निवडले जाणार आहे. त्यांना दुसर्या राउंडमध्ये गायनाची संधी दिली जाणार आहे.यातून अनुक्रमे पहिले पाच स्पर्धक बक्षीसांसाठी निवडले जाणार आहेत. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
नाव नोंदणी कालावधी : नाव नोंदणी 2 ऑक्टोबरपर्यंत करावयाची आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी 7498961338 करावयाची आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.