‘एक देश एक निवडणूक’ समितीचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

‘एक देश एक निवडणूक’ विधेयकबाबत केंद्र सरकार कडून स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य १७ ते १९ मे दरम्यान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या समितीने राज्याचे गृह, अर्थ, विधी, शिक्षण, शिष्टाचार, निवडणूक या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर, तसेच राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. खा. पी.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ३१ खासदारांची ही समिती सर्व राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांशी चर्चा करीत आहेत. आता ही समिती तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.

प्रमुख नेत्यांची चर्चा : यावेळी समितीने माजी मुख्यमंत्री, सर्व प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुंबई येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर आणि दीर्घ चर्चा केली.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खा. मनीष तिवारी, शिवसेनेचे खा. अनिल देसाई, आपचे खासदार संजय सिंह, भाजप खा. अनुराग ठाकूर, खा. संबित पात्रा, समाजवादी पार्टीचे आ. अबू आजमी, रासप नेते महादेव जानकर, आदीसह राज्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

समिती अहवाल तयार करणार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्त समितीसमोर ‘एक देश एक निवडणूक’ या महत्वाच्या विधेयकबाबत महत्वपूर्ण चर्चा करीत आपले मुद्दे मांडले. एक देश एक निवडणूक देशासाठी योग्य की अयोग्य याचा अहवाल समिती तयार करणार असून, समितीत भाजपचे 10, काँग्रेसचे 3, समाजवादी, तृणमूल काँग्रेस, डीमके, टिडीपी, राष्ट्रवादी, आरएलडीचे एकूण 21 सदस्य आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!