कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभला असून त्यांनी राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा विचार दिला. त्याच यशवंत विचारांना अनुसरून यापुढे काम करणार असून सर्वसामान्य जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने चांगले, सुसंस्कृत राजकारण करण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
अभिवादन : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सोमवारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जनतेने स्वीकारल्याचा आनंद : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला स्वीकारले, याचा मला जास्ती आनंद झाला असल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, माझ्यावरील जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून जनतेने मला दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न राहील. कराड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जे लागेल ते आपण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ग्वाही दिली आहे. या मतदारसंघातील जनतेच्या सर्व मागण्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.
सर्वांना विश्वासात घेऊ : कराड दक्षिणमधून आपला विजय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तुम्ही त्यांची भेट घेणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आहे. सुसंस्कृत राजकारणाचा त्यांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. यामुळे निश्चित चांगले, प्रगतीचे काम करत असताना विरोधकांशी चर्चा करण्याच्या बाबतीतचा प्रयत्न भविष्यकाळात निश्चित राहील. तसेच सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याबद्ददलची भूमिका घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, श्री. विनायक भोसले, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, श्रीरंग देसाई, दत्तात्रय देसाई, वसंतराव शिंदे, विनायक पावसकर, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, माजी नगरसेवक सुहास जगताप, हणमंतराव पवार, अतुल शिंदे, महादेव पवार, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, माजी सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक दिनेश रैनाक, हणमंतराव जाधव, राजू मुल्ला, पैलवान आनंदराव मोहिते, सूरज शेवाळे, अजय पावसकर, प्रमोद शिंदे, दाजी जमाले, रमेश लवटे, माजी जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, सौ. सारिका गावडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.