ना. नरेंद्र पाटील; नव उद्योजकांना राष्ट्रीयकृत व सहकारी बँका हातभार लावतील
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्रामध्ये एक लाख ३२ हजार लाभार्थ्यांना आम्ही उद्योजक बनवू शकलो. याहून अधिक लाभार्थ्यापर्यंत महामंडळाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून उत्साह आहे. भविष्यामध्ये या योजनेमधून अजून लाभार्थी व्हावेत, अशी अपेक्षा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.













