शेकडो व्यवसायिक व ग्राहकांची उपस्थिती; एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पर्वणी
कराड/प्रतिनिधी : –
कराड, पाटण आणि माण-खटावसारख्या शहरी व निमशहरी भागातील बांधकाम क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या नरेडको (NAREDCO) संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘होमथॉन 1.0’ प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रविवार (दि. 25) हा एक्स्पोचा अक्षरशः ‘सुपर संडे’ ठरला.
शेकडो व्यवसायिक, ग्राहकांची एक्स्पोला भेट : रविवारी बांधकाम क्षेत्रातील लहान-मोठे व्यावसायिक, साहित्य विक्रेते, आर्किटेक्ट, कंत्राटदार यांच्यासह शेकडो ग्राहकांनी एक्स्पोला भेट दिली. परिणामी एक्स्पो परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. शुक्रवार (दि. 23) ते बुधवार (दि. 27) जानेवारी दरम्यान भरवण्यात आलेला हा ‘होमथॉन 1.0’ एक्स्पो केवळ प्रदर्शन न राहता, बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्व घटकांसाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे.

महत्त्वपूर्ण व्यासपीठ : बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, विविध साहित्य विक्रेते, दुकानदार, कामगार, तसेच कराड, मलकापूरसारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक्स्पो एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनला आहे. या एक्स्पोमध्ये घर, फ्लॅट, प्लॉट, निवासी व व्यावसायिक प्रकल्पांसह अत्याधुनिक बांधकाम साहित्य, नवनवीन तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या आहेत.
आकर्षक स्टॉल : बांधकाम क्षेत्राशी संबंधित नामांकित कंपन्या, गृहशोभेच्या वस्तू, पेंट, बिल्डिंग मटेरियल, फर्निचर, गार्डन डिझाईन, किचन सोल्युशन्स, लाइटिंग मटेरियल आदींचे आकर्षक स्टॉल येथे उभारण्यात आले आहेत. ग्राहकांना प्रत्यक्ष पाहणी करून तुलना करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची संधी मिळत असल्याने रविवारी सहकुटुंब मोठ्या संख्येने नागरिकांनी एक्स्पोला भेट दिली. विशेषतः अनेक स्टॉलवर महिला भगिनींची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली.

मेगा ‘लकी ड्रॉ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नरेडकोच्या ‘होमथॉन 1.0’ एक्स्पोला भेट देणाऱ्या महिला, माता-भगिनींसाठी खास मेगा ‘लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले आहे. एक्स्पोला भेट देणाऱ्या प्रत्येक महिलेला विनामूल्य कूपन देण्यात येत असून, त्याद्वारे आकर्षक बक्षिसांची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बक्षीस वितरण सोहळा
या लकी ड्रॉमध्ये दहा भाग्यवान महिलांना ओरिजिनल पैठणी साडी, तर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला पैठणीसह १ ग्रॅम सोन्याची नेकलेस देण्यात येणार आहे. हा मेगा लकी ड्रॉ बुधवार (दि. 27) रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार असून, कृष्णा उद्योग समूहाच्या प्रमुख आदरणीय सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

“नरेडकोच्या ‘होमथॉन 1.0’ एक्स्पोला जिल्हाभरातून बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक आणि ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शेकडो ग्राहक, महिला भगिनींनी एक्स्पोला भेट दिली आहे. या माध्यमातून अनेकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. हेच या एक्स्पोचे, तसेच नरेडकोच्या कार्याचे खरे यश आहे.
– अरविंद खबाले, (संस्थापक अध्यक्ष, नरेडको)











