महंमद रफी जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी कराडमध्ये बहारदार गीतांचा कार्यक्रम
कराड/प्रतिनिधी : –
महान गायक महंमद रफी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या अजरामर गीतांना उजाळा देण्यासाठी मंगळवार, दि. 24 डिसेंबर रोजी कराड येथे सुनही शाम रफी के नाम अंतर्गत सौ बार जनम लेंगे.. हा बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम : महंमद रफी म्युझिक अॅकॅडमीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन टाऊन हॉल येथे रात्री 9 वाजता हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाची संकल्पना महागुरू असिफ बागवान व मोहंमद अनिस यांची आहे.
आवाहन : कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.