कराडच्या लघुनाटिका स्पर्धेत सर्वोदय कलामंचची बाजी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

जोकर्स थिएटर द्वितीय, तर पेठ नाकाचा सारथी कलामंच तृतीय

कराड/प्रतिनिधी : –

येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात परीसस्पर्श युथ क्रिएशनच्या ९ व्या राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यात लातूरच्या सर्वोदय कलामंचच्या कलाकारांनी बाजी मारत प्रथम क्रमांकाचा करंडक जिंकला.

रसिकांचा प्रतिसाद : या स्पर्धेला कराडकर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेतून लातूरच्या सर्वोदय कलामंच्य एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. तर मुंबईच्या जोकर्स थिएटरने द्वितीय क्रमांक मिळाला. पेठ नाका येथील कला सारथी कलामंचने तृतीय क्रमांक पटकावला.कला स्पंदन क्रिएशन कराड व समर्थ अकादमी पुणेच्या या लघुनाटिकांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.

बक्षीस वितरण : बक्षीस वितरण समारंभ अभिनेते रोहित चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कला दिग्दर्शक वासू पाटील, पत्रकार सतीश मोरे, प्रा. प्रमोद सुकरे, संस्थेचे अध्यक्ष संतोष मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उपक्रमांचे कौतुक : यावेळी पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांनी पुरस्कारांप्रती आभार मानले. प्रमुख पाहुणे प्रा. प्रमोद सुकरे यांनी परिसस्पर्शच्या उपक्रमांचे कौतुक केले. लघुनाटिका स्पर्धेत सातत्य ठेवल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले. डॉ. स्वप्नील चौधरी यांनी सादर केलेल्या ‘चल दंगल समजून घेवू’ व ‘निसर्ग’ या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

गौरवमूर्ती :  कार्यक्रमात राजेंद्र संकपाळ (नृत्यदिग्दर्शक), बाळकृष्ण शिंदे (अभिनेते व दिग्दर्शक), दया एकसंबेकर (अभिनेत्री), डॉ. स्वप्नील चौधरी (कवी), तृप्ती शेडगे (अभिनेत्री) यांना परिसस्पर्शच्या वतीने प्रेरणा पुरस्कार देण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट लेखन प्रतीक शिलेवंत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आदर्श पाटील, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अक्षता साळवी, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक शिंदे व मनोज झुंगा, अनस्टाँबेबल स्टोरी स्वराली चव्हाण, सिद्धी मोहिते, आरव शिंदे यांना वैयक्तिक पातळीवर बक्षिसे देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण : स्पर्धेचे परीक्षक म्हणून मयुरेश पाटील, निलेश महिगावकर, नितीन वाडेवाले, शरद पाटील यांनी काम पाहिले. प्रास्ताविक सुहास चव्हाण, सूत्रसंचालन मिथून माने व विनायक साळुंखे, पृथ्वीराज पाटील यांनी आभार मानले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!