पाटण तालुक्यातील नाडे येथील रघुकुल प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी श्रीजा पुपलवाड हिने मंथन प्रज्ञाशोध स्कॉलरशिप परीक्षेत 150 पैकी 148 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
आय.एम विनर स्कॉलरशिपमध्येही यश : तसेच चालू वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या आय.एम विनर स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेत देखील राज्य गुणवत्ता यादीत 6 वी येण्याचा बहुमान श्रीजाने पटकावला आहे.
गुणगौरव : या दोन्ही परीक्षेतील सुयशाबद्दल तिचे पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी नायकवडी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कानवटे, तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे व पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, शिक्षक संघाचे कार्यकर्ते व सर्व सभासद उपस्थित होते.