आटके (ता. कराड) येथील प्रियांका बाजीराव पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. यात प्रियांका बाजीराव पाटील यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे.
मोलाचे मार्गदर्शन : या परीक्षेसाठी पुणे येथील, गणेश शिरसाट ॲकॅडमीचे ॲड. गणेश शिरसाट यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
यशाचे श्रेय : परीक्षेत मिळालेल्या यशाचे श्रेय तिने वडील बाजीराव गणपती पाटील आणि आई सौ. निर्मला बाजीराव पाटील व भाऊ सचिन बाजीराव पाटील आणि गुरुवर्य ॲड. गणेश शिरसाट यांना दिले आहे.
कौतुक : तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा आपल्या मुलीने आटके गावातील पहिली न्यायाधिश झाल्याने कौतुक केले.
अभिनंदन : प्रियांका पाटील यांच्या या निवडीबद्दल आटके गावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.