नागरिकांचा निर्धार; विद्यमान आमदार भागात फिरकले नसल्याची टीका
कराड/प्रतिनिधी : –
आमची मते घेऊन आमदार झालेल्यांनी नंतर आमच्या वाढीव भागातील समस्यांकडे ढुंकुनही पाहिले नाही. मुळात ते इकडे कधी फिरकलेच नसल्याची अशी टीका येथील स्थानिक नागरिकांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. तसेच आमच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी तत्परता दाखविणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
वाढीव भागातील नागरिकांशी संवाद :
शहरातील दौलतनगर कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, मुजावर कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा पूर्व भाग, धाराशिव वसाहत, शिक्षक कॉलनी, सूर्यवंशी मळा, अष्टविनायक कॉलनी या वाढीव परिसरात डॉ. अतुल भोसले यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी या परिसरातील समस्यांचा पाढा भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासमोर वाचला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी शिवराज इंगवले, डॉ. राजेंद्र कंटक, विक्रांत देशमुख, सागर धावणे, विकास भुजंगे, राहुल सूर्यवंशी, अशोक पवार, शशिकांत होगडे, अमोल कांबळे, मुनाफ सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
60 वर्षांत रस्ता न होणे शोकांतिका : कराड शहराचा वाढीव भाग विकासापासून पूर्णपणे वंचित राहिला असल्याचे सांगत डॉ. भोसले म्हणाले, गेल्या 60 वर्षांत या भागात रस्ताच झाला नसेल, तर ही फार मोठी शोकांतिका आहे. या भागातील कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी, त्यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी मी विशेष प्रयत्नशील आहे.
वाढीव भागाचा कायापालट करणार : येत्या काळात या भागातील रस्ते, गटर्स, पाण्यासह सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्यासाठी मी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगत डॉ. भोसले म्हणाले, कराडमधील वाढीव भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध राहीन, अशी ग्वाहीही त्यांनी निवड दिली. तसेच आपण सर्वांनी संधी दिल्यास या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असे अभिवचनही डॉ. भोसले यांनी यावेळी दिले.