कराड/प्रतिनिधी : –
केंद्र व राज्य सरकारकडून जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुहास जगताप व मित्र परिवार करत आहे. समाजसेवेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचा लाभ झाला अनेक लोकांना झाला असून सुहास जगताप व मित्र परिवाराचे काम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
उपक्रमास भेट : येथील सोमवार पेठेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून आयुष्मान भारत व मुख्यमंत्री वयोश्री योजनाची मोफत नोंदणी उपक्रम माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी राबवला. या उपक्रमास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.
400 नागरिकांचा सहभाग व नोंदणी : माजी नगरसेवक सुहास जगताप व मित्र परिवाराने राबवलेल्या या उपक्रमात सुमारे 400 नागरिकांनी सहभागी होवून नोंदणी केली. तसेच युवा उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले.
सामाजिक उपक्रमांचा नागरिकांना लाभ : महायुतीने लाडकी बहिण योजनेने महिलांना आर्थिक सक्षम केले केले असल्याचे सांगत सुहास जगताप म्हणाले, तसेच तरुणांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या असून कोट्यावधी जनतेने त्याचा लाभ घेतला आहे. महायुतीच्या सर्व योजना तळागाळात पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत. यापूर्वीही आरोग्य शिबिरे, बचत गटांचे स्टॉल असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून त्याचा लाभ नागरिकांना झाला आहे.
बहुमूल्य योगदान : हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुहास जगताप, दुष्यंत देशपांडे, ढवळे, वेदसंवर्धक मंडळ घळसासी, एन. डी. कुलकर्णी, शशिकांत देशपांडे, शामला देशपांडे, बजरंग माने, सुधा ढवळीकर, चंद्रकांत काटवे, श्रीराम येळगावकर, सदाशिव भावके, चंद्रहास पुजारी यांनी परिश्रम घेतले.