नांदगाव (ता. कराड) येथील जागृत देवस्थान श्री यल्लमा देवीची यात्रा रविवार (दि. 29) डिसेंबरपासून सुरू होत आहे. यात्रेनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
मुख्य धार्मिक कार्यक्रम : या यात्रेनिमित्त रविवार (दि. 29) रोजी पहाटे 6 वाजता देवीची महापूजा करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 5.30 वाजता मंदिराच्या आवारात मुख्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद, तर रात्री 8 वाजता गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री 10.30 वाजता देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.
देवीची महापूजा :सोमवार (दि. 30) रोजी पहाटे 6 वाजता देवीची महापूजा, सकाळी 10 वाजता भक्ती संगीताचा कार्यक्रम, दुपारी 12 वाजता होम हवन, सायंकाळी 5.30 वाजता महाआरती, तर रात्री 9 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
महाप्रसाद व चक्रीभजन :मंगळवार (दि. 31) रोजी पहाटे 6 वाजता महापूजा, सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद व रात्री 9 वाजता चक्रीभजन होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.