आमदार डॉ. अतुलबाबा भोसले; दोन कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्ते सुधारणा कामाचे भूमिपूजन
कराड/प्रतिनिधी : –
काले गावासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या काळात विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी 87 लाखांचा निधी मला खेचून आणता आला याचे समाधान आहे. येत्या काळात सुद्धा काले गावच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
भूमिपूजन : काले (ता. कराड) येथे 2 कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्तेसुधारणा कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
दोन कोटींचा निधी : काले येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या काळात राज्य शासनाच्या जिल्हा व इतर मार्ग योजनेअंतर्गत दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याअंतर्गत काले जुने स्टँड ते स्मशानभूमी ते देसाई मळा ते रा.मा. 148 रस्ता ग्रा.मा. 238 कि.मी. 0/00 ते 3/00 (भाग काले ते प्रजिमा 62) या रस्त्याची सुधारणा केली जाणार असून, या विकासकामाचे भूमिपूजन आ.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण होतील : जनतेपर्यंत विकासाची गंगा चिरंतनपणे पोहचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकार कार्यरत असल्याचे सांगताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, गेल्या काळात मंजूर झालेली अनेक कामे पूर्णत्वास गेली असून, काही प्रगतीपथावर आहेत. येत्या काही महिन्यात मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झालेली दिसतील.
घाट उभारणी योजनेतून निधी आणू : काले येथे पूरहानी योजनेतून घाट उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून निधी आणणे शक्य आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीने ताबडतोब प्रस्ताव द्यावा. तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठीही ताबडतोब पैसे उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आ. डॉ. भोसले यांनी दिली.
उपस्थित मान्यवर : यावेळी य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, सरपंच शंकरराव तांदळे, उपसरपंच प्रकाश पाटील, विवेक पाटील, माजी सरपंच अल्ताफ मुल्ला, के. एन. देसाई, सत्यजीत देसाई, संजय देसाई, नीळकंठ शेडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.