कराड/प्रतिनिधी : –
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी प्रीतिसंगम घाटावर आदरांजली वाहण्यात येणार आहे.
वेळ व ठिकाण : या हल्ल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या भ्याड हल्याच्या निषेधार्थ विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता प्रीतिसंगम घाटावर मेणबत्या प्रज्वलीत करुन हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
आवाहन : कराड शहर व परिसरातील सर्व आबालवृध्दांनी या भ्याड हल्याच्या निषेधार्थ आयोजित आदरांजली कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने अध्यक्ष निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले आहे.