भाजपा सदस्य नोंदणीत कराड दक्षिणची बाजी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुल भोसले; गाव चलो,  वस्ती चलो अभियान व संघटनपर्व आढावा बैठक

कराड/प्रतिनिधी : – 

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देश व राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. या अभियानामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्राथमिक सदस्यांची नोंद ८२, ६४५ इतकी झाली आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील २६ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या सगळ्यामध्ये कराड दक्षिणने अतिशय चांगले काम केले असून यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने बाजी मारली असल्याचे मत आ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

अभियान व आढावा बैठक : भाजप पश्चिम महाराष्ट्र विभाग ‘गाव चलो, वस्ती चलो अभियान’ व संघटनपर्व आढावा बैठक कराड येथे उत्साहात पार पडली. याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : या बैठकीस भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे यांच्यासह बहुसंख्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

प्राथमिक सदस्य नोंदणी : सदर अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना आ. अतुल भोसले म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ८२, ६४५ इतकी प्राथमिक सदस्यांची नोंद झाली आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. विशेषतः मतदारसंघातील ३४२ बूथ समित्या पूर्ण आहेत. त्यामुळे पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी आम्ही योग्यरित्या पार पाडली असल्याचे आ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट आहे.

कराड दक्षिण काँग्रेसमुक्त करू

भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मुक्तचा नारा दिला आहे. तोच नारा आम्ही मतदारसंघामध्ये दिला असून काँग्रेसमुक्त कराड दक्षिण प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वजण एकदिलाने प्रयत्न करीत आहोत. या मतदारसंघातील काँग्रेसची सगळी रचना आम्ही मोडून काढण्याचे काम करून ते गोडाऊन ठेवले असल्याची बोचरी टीकाही आ. भोसले यांनी यावेळी केली. 

चांगली भूमिका बजावणाऱ्यांना मोठी संधी

भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या सदस्य नोंदणी अभियानात कराड दक्षिणची कामगिरी कौतुकास्पद आहेच. परंतु, यामाध्यमातून पक्षवाढीत जे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगली भूमिका बजावतील. त्यांना नक्कीच भविष्यात मोठी संधी दिली जाईल, अशी ग्वाही देखील आ. भोसले यांनी याप्रसंगी दिली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!