परभणी घटनेच्या निषेधार्थ कराडमध्ये मोर्चा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे याला हिंसक वळण लागले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कराड शहर व तालुक्यातील आंबेडकर समाज, विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

निवेदन : यावेळी मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना  आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात केले. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली.

जातीयवादी शक्तींचा हात : परभणी येथे 10 डिसेंबरला घडलेल्या घटनेने संविधानावर प्रहार झाला आहे. या घटनेमागे जातीयवादी शक्तींचा हात असल्याचा संशय असून, सखोल चौकशी करून दोषींवर राष्ट्रद्रोह प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

कायदा व सुव्यवस्थेला आव्हान : संविधानाच्या प्रतीवर हल्ला म्हणजे देशातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान आहे. सरकारने त्वरीत हस्तक्षेप करून दोषींना शिक्षा केली पाहिजे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

उपस्थिती : या मोर्चामध्ये आंबेडकरी विचारसरणीचे विविध नेते आणि कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल भोसले, नितीन ढेकळे, दत्तात्रेय दुपटे, बहुजन समाज पार्टीचे किरण थोरवडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे, विद्याधर गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे, आर.पी.आय. (ए) चे मुकुंद माने, वंचित बहुजन आघाडीचे संतोष बोलके, मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक सलीम पटेल, काँग्रेसच्या बी. सी. सेलचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके, जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळोखे, दलितमित्र कादर नायकवडी, योगेश लादे, सारिका लादे, प्रशांत थोरवडे यांचा समावेश होता.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!