आर. वाय. कणसेंसह कुटूंबाचे सामाजिक कार्यात योगदान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

श्रीनिवास पाटील; युवा पिढीसह समाजापुढे निर्माण केला नवा आदर्श

कराड/प्रतिनिधी : –

आज समाजातील नितीमुल्ये नष्ट होत असतानाच शेणोलीतील कणसे परिवाराकडून आदर्श घेणे गरजेचे आहे. स्व. प्रा. आर. वाय. कणसे यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांनी आपल्या गावासह परिसरातीलत सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.

पुस्तक प्रकाशन : स्व. प्रा. आर. वाय. कणसे यांच्या जीवन चरित्रावरील ‘कृतार्थ मी, कृतज्ञ मी’ या विजया रघुनाथ कणसे लिखित चरित्रात्मक पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, विजया कणसे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसिलदार अर्चना पाटील, डॉ. रणधिर शिंदे, शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

‘कृतार्थ मी, कृतज्ञ मी’ पुस्तकाचे प्रकाशन : प्रारंभी, डॉ. सुरेश भोसले, श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ‘कृतार्थ मी, कृतज्ञ मी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्व. प्रा. आर. वाय. कणसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

गौरवोद्गार : डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले, आनंदराव पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील यांनी स्व. आर. वाय. कणसे यांच्या कार्याला उजाळा देत चैत्यन कणसे, बाळासाहेब कणसे यांच्यासह कणसे परिवाराच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.

युवा पिढीला योग्य दिशा दिली : सात दशकापूर्वी शेणोलीसारख्या कुसळाच्या माळावर स्व. आर. वाय. कणसे यांनी बंधू बाळासाहेब यांना सोबत घेत नंदनवन फुलविले असल्याचे सांगत श्रीनिवास पाटील म्हणाले, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी राहून युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे काम स्व. आर. वाय. कणसे यांच्यासह संपूर्ण कणसे कुटूंबियांकडून आजही हे कार्य ताकदीने सुरू आहे.

एक आदर्श निर्माण केला : नितीमुल्ये, संस्कार यासह सामाजिक जाणीव कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच आज कणसे कुटूंबियांनी मात्र एक आदर्श निर्माण केला आहे. आपण संपूर्ण देश विदेशात फिरलो असून कणसे कुटूंबियांसारखे आदर्शवत काम आपण प्रथमच पहात असल्याचे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

अभिवादन : यावेळी विजया कणसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमानंतर आ. डॉ. अतुलबाबा भोसले व काँग्रेस नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी कणसे कुटूंबियांची भेट घेत स्व. आर. वाय. कणसे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे, पै. प्रमोद कणसे यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटूंबीय, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदुराव पाटील, सभापती प्रकाश पाटील, राजेश पाटील वाठारकर, पै. धनाजी पाटील, पै. संतोष वेताळ, पै. आनंदराव मोहिते यांच्यासह एमएसईबी अभियंता सत्यजित घार्गे, विजयसिंह चव्हाण व मान्यवर उपस्थित होते. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!