मंथन स्पर्धेत बेलवडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे यश
कराड/प्रतिनिधी : –
बेलवडे बुद्रुक (ता. कराड ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत राज्य आणि जिल्हा स्तरावर घवघवीत यश मिळविले. दोन विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. तर ५ विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
उज्वल यश :मंथन स्पर्धेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थी सौमित्र महेश राजमाने याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर इयत्ता दुसरीतील विद्यार्थीनी इरा गणेश मोहिते हिने राज्यात पाचवा क्रमांक पटकावत उज्वल यश संपादन केले आहे.
जिल्ह्यातही अग्रक्रम : इयत्ता पहिलीतील आरोही संभाजी मोहिते हिने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. इयत्ता दुसरीतील युगा सुहास जगधणी हिने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. इयत्ता पहिलीतील शिवरत्न चंद्रकांत माने याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. राजवीर वसंत मोहिते याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. आयुषी सागर मोहिते हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला.
मोलाचे मार्गदर्शन : विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुभाष शेवाळे, उमाकांत जंगम, ज्योती डोंबे-राजमाने, सतीश जाधव, सविता कराळे, निरंजना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
अभिनंदन : या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक , पालकांनी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.