परिवर्तन यात्रेला कराड उत्तरेत बदल घडवेल 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रामकृष्ण वेताळ यांचे प्रतिपादन; विधानसभेत नवीन चेहरा पाहण्याची मतदारांना संधी 

कराड/प्रतिनिधी : – 

भाजपच्या वतीने आयोजित परिवर्तन यात्रेला ओगलेवाडी परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद कराड उत्तरेत बदल घडवेल. यामुळे विधानसभेत नवीन चेहरा पाहण्याची संधी उत्तरेतील मतदारांना मिळेल, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले.

परिवर्तन यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद : शामगाव (ता. कराड) येथे परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, सागर शिवदास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

लोकांच्या अपेक्षा वाढल्या : संपूर्ण कराड उत्तर मतदारसंघात लोकांचा यात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे सांगत रामकृष्ण वेताळ  म्हणाले, विकासाच्या कामाची वाढलेली गती आणि मिळत असलेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरील निधी यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणूनच यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कराड उत्तर विकासात अग्रेसर होईल : यावेळी भाजपला साथ द्या. कराड उत्तर हा मतदारसंघ विकासात अग्रेसर होईल, असा विश्वास योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. 

लोकांनी मांडल्या समस्या व अडचणी : यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. लोकांनीही आपल्या समस्या आणि अडीअडचणी या नेत्यांच्या समोर उपस्थित केल्या.

रामकृष्ण वेताळ यांचे केले कौतुक : याप्रसंगी शामगाव पाणी योजनेसाठी केलेल्या  प्रयत्नांबद्दल उपस्थितांनी रामकृष्ण वेताळ यांचे कौतुक केले जात आहे. अनेक वर्ष पाण्यासाठी धडपडणाऱ्या शामगावकरांचा पाणी प्रश्न कोणीही व्यवस्थित हाताळला नव्हता. रामकृष्ण वेताळ यांनी सतत चार वर्षे यासाठी प्रयत्न केले आणि हा प्रश्न मार्गी लावला याबद्दल लोकांनी जाहीर आभार व्यक्त केले.या परिवर्तन यात्रेत शामगाव, पाचुंद, मेरवेवाडी, वाघेरी, करवडी या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. 

मान्यवरांची उपस्थिती : या परिसरातील भाजपचे नेते जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, तालुकाध्यक्ष शंकर शेजवळ, बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षा दिपाली खोत, महिला मोर्चा अध्यक्ष सीमा गार्गी, नवीन जगदाळे, शहाजी मोहिते, तुकाराम नलावडे, सुमित शहा, रघुनाथ शेडगे, जयसिंग डांगे, सयाजी शिंदे, सचिन शिंदे, अक्षय भोसले, पायल जाधव, माजी उपसरपंच बाळासाहेब पोळ, मुरलीधर पोळ, ग्रामपंचायत सदस्य राहुल यादव, योगेश फाटक आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!