यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार तसेच माता-बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण १७० जणांची सखोल आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.
आरोग्याकडे विशेष लक्ष : या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी बोलताना सुतार म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे ऊसतोड कामगारांच्या आरोग्य व कल्याणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. ऊसतोड कामगारांनी मेहनतीचे काम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले असेल तरच कामात सातत्य व गुणवत्ता राहते, असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : या शिबिरात जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, डॉ. हर्षल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. सचिन जगताप, डॉ. आरगो स्वामी, डॉ. सर्वेश दीक्षित, डॉ. शुभम शहा, डॉ. साई चरण, डॉ. श्रेया कतारे यांनी वैद्यकीय तपासणी व उपचार केले.
विशेष सहकार्य : शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका राधिका लोखंडे, स्वाती चोपडे, मानसी चोपडे, मयुरी वडकर, अमृता धर्मे, अश्विनी गायकवाड, दीपाली हुलवान आदींनी विशेष सहकार्य केले.
उपक्रमाचे कौतुक : या उपक्रमामुळे ऊसतोड कामगार व माता-बालकांच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली असून, लाभार्थ्यांनी कारखाना व कृष्णा हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.