विद्या वेताळ यांचा शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ. विद्या रामकृष्ण वेताळ यांनी आज भव्य शक्तीप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कराड उत्तरचे दमदार नेतृत्व : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दमदार नेतृत्व, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली हा अर्ज दाखल करण्यात आला.

कार्यकर्ते, नागरिकांची उपस्थिती : नागरिकयावेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटासह कोपर्डे हवेली व वाघेरी पंचायत समिती गणातील हजारो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिवादन : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सौ. विद्या वेताळ व रामकृष्ण वेताळ यांनी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

भव्य रॅली : त्यानंतर कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील १६ गावांमधील कार्यकर्ते व महिलांची भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली शिवतीर्थ येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, भेदा चौक मार्गे यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहापर्यंत नेण्यात आली.

ढोल-ताशांचा गजर : या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, पक्षाचे झेंडे व घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या शक्तीप्रदर्शनामुळे कोपर्डे हवेली गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले.

उपस्थिती : यावेळी विरवडे गावचे ज्येष्ठ नेते व माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे, सुदाम चव्हाण, बाळासाहेब पोळ, लालासो जगदाळे, शिवाजी जगदाळे, बाळासो नाइगडे, चेअरमन सुरेश पाटील, बबन पवार, जयसिंग डांगे, सुभाष जाधव, संदीप बाबर, संभाजी इंगवले, दीपक इंगवले, सचिन शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

घोषणांनी कराड दणाणले…

सौ. विद्या रामकृष्ण वेताळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातील महिलांनी उपस्थित लावली. यावेळी कराडमध्ये काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये ‘रामकृष्ण वेताळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’… अशा घोषणांनी कराड शहर दणाणून गेले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!