धर्म - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Mon, 21 Jul 2025 10:28:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png धर्म - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 कराडमध्ये भागवत सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://janswarashtra.com/archives/6436 https://janswarashtra.com/archives/6436#respond Mon, 21 Jul 2025 10:28:44 +0000 https://janswarashtra.com/?p=6436 उद्या समारोप; महाप्रसादाचे आयोजन कराड/प्रतिनिधी : – येथील राधाकृष्ण मंदिरात राधाकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित भागवत सप्ताह सध्या उत्साहात पार पडत असून, याला भाविक भक्तांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप आज मंगळवार, २२ जुलै रोजी महाप्रसादाने होणार आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण : या सप्ताहात दररोज सकाळी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण साताऱ्याचे प्रसिद्ध ... Read more

The post कराडमध्ये भागवत सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद first appeared on Jan Swarashtra.

]]>
उद्या समारोप; महाप्रसादाचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

येथील राधाकृष्ण मंदिरात राधाकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित भागवत सप्ताह सध्या उत्साहात पार पडत असून, याला भाविक भक्तांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप आज मंगळवार, २२ जुलै रोजी महाप्रसादाने होणार आहे.

श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण : या सप्ताहात दररोज सकाळी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण साताऱ्याचे प्रसिद्ध वेदमूर्ती आशुतोष रानडे करीत आहेत, तर दुपारी कथाकथनाचे सत्र डॉ. विनायक गरुड यांच्या मधुर वाणीतून रंगत आहे. या कथांमध्ये वराह, नरसिंह, मत्स्य, राम आदी विविध अवतारकथा, तसेच १८ जुलै रोजी श्रीकृष्ण जन्म, १९ रोजी रुक्मिणी स्वयंवर, तर २० रोजी सुदाम्याचे पोहे या कथा विशेष आकर्षण ठरल्या.

तब्बल २०० वर्षांची परंपरा : कराडमध्ये भागवत सप्ताहाची परंपरा तब्बल २०० वर्षांची असून, पूर्वी अनेक मंदिरांमध्ये हा सप्ताह भरत असे. सध्या आषाढ महिन्यातील पर्वकाळात कृष्णा-कोयनेच्या संगमावरील कृष्णामाई घाटावर वसलेल्या वेदशास्त्र संपन्न कै. बाळकृष्णमामा गरुड यांच्या राधाकृष्ण मंदिरात गेली पाच वर्षे हा सप्ताह सातत्याने आयोजित होतो आहे.

सहभाग : या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी कराड कन्यागत महोत्सव समिती, जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व राधाकृष्ण देवस्थान ट्रस्ट यांचे कार्यकर्ते सेवाभावी भावनेने सहभागी झाले. या सप्ताहाच्या समारोपानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गरुड यांनी केले आहे.

The post कराडमध्ये भागवत सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6436/feed 0
सद्गुणसंपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे https://janswarashtra.com/archives/6395 https://janswarashtra.com/archives/6395#respond Wed, 16 Jul 2025 15:36:14 +0000 https://janswarashtra.com/?p=6395 सुनिलबापू लाड; गुरुपौर्णिमेनिमित्त शिवप्रतिष्ठानतर्फे शिवशंभू छत्रपती विषयावर व्याख्यान; गडकोट मोहिम, दुर्गामाता दौड, विवेकसभेचे महत्त्व अधोरेखित  कराड/प्रतिनिधी : – “शिष्याच्या अंतःकरणात स्वत्व जागवणारा गुरूच खरा सद्गुरू असतो. शिवरायांच्या जीवनात ही शिकवण राष्ट्रनिर्मितीचे अधिष्ठान ठरली. छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानातून देशासाठी कसे मरावे, हे आपणास शिकायला मिळाले. आजही संभाजी भिडे गुरुजी या आदर्शांचे जतन करून तरुणांमध्ये देव, देश, धर्म ... Read more

The post सद्गुणसंपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे first appeared on Jan Swarashtra.

]]>
सुनिलबापू लाड; गुरुपौर्णिमेनिमित्त शिवप्रतिष्ठानतर्फे शिवशंभू छत्रपती विषयावर व्याख्यान; गडकोट मोहिम, दुर्गामाता दौड, विवेकसभेचे महत्त्व अधोरेखित 

कराड/प्रतिनिधी : –

“शिष्याच्या अंतःकरणात स्वत्व जागवणारा गुरूच खरा सद्गुरू असतो. शिवरायांच्या जीवनात ही शिकवण राष्ट्रनिर्मितीचे अधिष्ठान ठरली. छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानातून देशासाठी कसे मरावे, हे आपणास शिकायला मिळाले. आजही संभाजी भिडे गुरुजी या आदर्शांचे जतन करून तरुणांमध्ये देव, देश, धर्म आणि राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा देत आहेत,” त्यानुसार शिवशंभू छत्रपतींनी सांगितलेल्या सद्गुणांच्या आधारावर युवकांना राष्ट्र उभारणीचे व्रत घ्यावे लागेल,” असे स्फूर्तीदायी विचार ज्येष्ठ धारकरी व कीर्तनकार सुनिलबापू लाड यांनी व्यक्त केले.

व्याख्यान : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान कराड-पाटण विभागाच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक के. एन. देसाई होते, तर खंडाळे काका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिवशंभू छत्रपतींना गुरूपरंपरेची शिकवण : “शिवराय हे केवळ राजे नव्हते, तर ते राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेली नीती, धर्म आणि शौर्य यांचे मूर्तिमंत रूप होते,” असे सांगताना सुनिलबापू लाड म्हणाले, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ आणि त्यांच्याच प्रेरणेतून घडलेले संभाजीराजे यांचे कार्य व जीवनमूल्य उलगडून दाखवले. “प्रभू श्रीराम वशिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनात घडले; अर्जुनाने श्रीकृष्णाच्या उपदेशाने धर्मपराक्रम केला; तसेच शिवशंभू छत्रपतींना त्यांच्या गुरूपरंपरेची शिकवण लाभली. ही शिकवणच त्यांच्या राष्ट्रनिर्मितीमागे असलेली आत्मिक शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

भिडे गुरुजी सद्गुरू परंपरेतील मार्गदर्शक : “आई-वडील, शिक्षक हे गुरु होतच, पण जे तुमच्या आत्म्याशी नाते जोडतात, विवेक जागवतात, तेच खरे सद्गुरू असतात. भिडे गुरुजी अशाच सद्गुरू परंपरेतील मार्गदर्शक आहेत, असे सांगत श्री. लाड म्हणाले, गुरुजींनी  शिवरायांच्या विचारांची सजीव पुनरावृत्ती केली आहे. शिक्षणावर केवळ चरितार्थ चालतो, पण राष्ट्रासाठी जगण्याचे तत्त्वज्ञान हे शिवशंभूंकडून मिळते,” असे गुरुजी सांगतात.

विवेकसभांची गावोगावी पुनर्रचना : “गडकोट मोहिम म्हणजे राष्ट्रभक्त युवक तयार करणारी कार्यशाळा आहे. तर दुर्गामाता दौड भक्ती म्हणजे काय, हे शिकवते. शिवरायांनी रायगडावर घेतलेल्या विवेकसभेची संकल्पना भिडे गुरुजींनी आपल्या मनात जागवली. अशा विवेकसभांची गावोगावी पुनर्रचना झाली पाहिजे.”, असे श्री. लाड यांनी सांगितले.

शिवराज्याभिषेक दिनच खरा स्वातंत्र्यदिन : “शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून परकीय सत्तांचा बंदोबस्त केला नसता, तर आजही आपण गुलामगिरीत असतो. त्यामुळे रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन हाच खरा स्वातंत्र्यदिन मानला पाहिजे,” असे श्री. लाड यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपात रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापनेसाठी चालू असलेल्या मोहिमेचा उल्लेख करत “कराड-पाटण विभागाने या उद्दिष्टपूर्तीसाठी पुढाकार घ्यावा. हीच खरी शिवभक्ती आणि गुरुसेवा ठरेल.” असे आवाहन श्री. लाड यांनी केले.

हीच खरी गुरुदक्षिणा : कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा कार्यवाह सागर आमले यांनी “छत्रपतींच्या विचारांनी युवक घडवण्याच्या गुरुजींच्या कार्यात सहभागी होणे, हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचे सांगितले.” यावेळी कराड-पाटण विभागातील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गड-किल्ल्यांआधी ताजमहाल युनेस्कोच्या यादीत का?”

“महाराष्ट्राला शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या शेकडो गड-किल्ल्यांचा तेजोमय इतिहास आहे. तरीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ताजमहाल प्रथम येतो, हे दुर्दैव नव्हे का? हा प्रश्न आपल्याला कधीच का पडत नाही?” असा रोखठोक सवाल सुनिलबापू लाड यांनी उपस्थित केला.

इतिहासाच्या विकृतीविरुद्ध संतप्त आवाज

“एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये शिवरायांचा उल्लेख केवळ २५ शब्दांत होतो, तर जगातील ५५ देशांमध्ये पदवी शिक्षणात त्यांचा इतिहास सक्तीने शिकवला जातो. आपल्या देशात मात्र जाज्वल्य इतिहास लपवण्याचा प्रयत्न झाला. आपल्या इतिहासाबद्दलची ही उदासीनता चीड आणणारी आहे,” असे सुनिलबापू लाड यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले.

“संस्कार संपले की, जीवन बोथट होते,”

आजघडीला घरोघरी शुभंकरोती म्हणणारे कमी झाले, गोमातेचे पालन लुप्त होत चालले. मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवले जाते, पण ऋषीमुनींच्या संस्कृतीचे भान राहिलेले नाही. त्यामुळे घराघरात अनारोग्य आणि तणाव वाढत आहेत. “संस्कार संपले की, जीवन बोथट होते,” असे निरीक्षणही सुनिलबापू लाड यांनी नोंदवले. 

 

The post सद्गुणसंपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6395/feed 0
भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिव-समर्थ परंपरेचे अमूल्य योगदान https://janswarashtra.com/archives/6385 https://janswarashtra.com/archives/6385#respond Tue, 15 Jul 2025 19:16:58 +0000 https://janswarashtra.com/?p=6385 भैय्याजी जोशी; ‘श्री शिवचरित्र’ व ‘श्री समर्थ चरित्र’ ग्रंथांचे प्रकाशन, सज्जनांना शक्तिशाली करण्याचे आवाहन कराड/प्रतिनिधी : – “भारत ही पुण्यभूमी, देवभूमी, पराक्रमी पुरुष आणि संतांची कर्मभूमी आहे. अनेक आक्रमणांतून व गुलामगिरीतून मार्ग काढत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रूपाने ३५० वर्षांपूर्वी इतिहासाच्या सुवर्णपानाची सुरुवात झाली. या सुवर्णकाळाचे लेखन समर्थ रामदास स्वामींनी केले असून भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिव-समर्थ ... Read more

The post भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिव-समर्थ परंपरेचे अमूल्य योगदान first appeared on Jan Swarashtra.

]]>
भैय्याजी जोशी; ‘श्री शिवचरित्र’ व ‘श्री समर्थ चरित्र’ ग्रंथांचे प्रकाशन, सज्जनांना शक्तिशाली करण्याचे आवाहन

कराड/प्रतिनिधी : –

“भारत ही पुण्यभूमी, देवभूमी, पराक्रमी पुरुष आणि संतांची कर्मभूमी आहे. अनेक आक्रमणांतून व गुलामगिरीतून मार्ग काढत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रूपाने ३५० वर्षांपूर्वी इतिहासाच्या सुवर्णपानाची सुरुवात झाली. या सुवर्णकाळाचे लेखन समर्थ रामदास स्वामींनी केले असून भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिव-समर्थ परंपरेचे अमूल्य योगदान आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.

ग्रंथ प्रकाशन सोहळा : येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्यावतीने सुप्रसिद्ध विचारवंत कै. साने गुरुजी लिखित ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय’ आणि ज्येष्ठ पत्रकार ज. सी. करंदीकर लिखित ‘श्री समर्थ चरित्र’ या ग्रंथांचे प्रकाशन भैय्याजी जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

चार भाषांत प्रकाशन : श्री शिवरायांचे कार्य भारतभर घरोघरी जावे, या उद्देशाने मराठीसह हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथमहाराज कोटणीस होते. याप्रसंगी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी, डॉ. अच्युत गोडबोले, कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, सीए दिलीप गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराड : ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना भैय्याजी जोशी, समवेत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

…म्हणून, शिवरायांना ‘श्रीमंत योगी’ उपाधी : “श्रीमंत योगी” ही चार गुणांची संगती सांगताना भैय्याजी जोशी म्हणाले, “ज्ञान, भक्ती, कर्म आणि साधना या चार अंगांनी समाजातील सज्जन व्यक्ती योगदान देतात. मात्र, या सर्वांचा संगम असलेलाच खरा योगी होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे असेच एकमेकांमध्ये गुंफलेले चारही गुणांचे मूर्तिमंत रूप होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी त्यांना ‘श्रीमंत योगी’ ही उपाधी दिली,”. समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना उद्देशून लिहिलेलं पत्र केवळ इतिहास नव्हे, तर एका समाजाला दिलेला आदर्शाचा आरसा आहे. त्यातील प्रत्येक शब्द हे ‘श्री शिवचरित्र’ या ग्रंथाचे मूर्त स्वरूप आहे,”.

भारताची शक्ती संरक्षक : भारत शक्तिशाली आहे, पण त्याची ही शक्ती संहारक नसून संरक्षक आहे. आज देश विविध क्षेत्रांत प्रगती करतो आहे. आपण त्याचे केवळ साक्षीदार न राहता सक्रिय सहभागी व्हावे,” असे आवाहन भैय्याजी जोशी यांनी केले.

‘हिंदवी स्वराज्य’ अस्तित्वात आले : “शिवरायांना जिजाऊ आणि शहाजीराजांनी दिलेल्या धर्म संस्कारांच्या जोडीला वेद, पुराणे, स्मृती, रामायण, महाभारत यांचे गहन अध्ययन होते. त्या अभ्यासाचा खरा परिणाम म्हणजे त्यांची राज्यकारभारातील कृती. यातूनच ‘हिंदवी स्वराज्य’ अस्तित्वात आले.”, असे मत विक्रमसिंह मोहिते यांनी व्यक्त केले.

सखोल संशोधन व्हावे : तळबीड येथील वीर हनुमान मंदिरात असलेल्या दुर्मिळ अंजनी मातेच्या मूर्तीचा उल्लेख करत ही मूर्ती अभ्यासासाठी महत्त्वाची असून त्यावर सखोल संशोधन व्हावे.”, असे मतही श्री. मोहिते यांनी व्यक्त केले.

…म्हणून, कराडनगरीची निवड : प्रास्ताविक करताना योगेशबुवा रामदासी म्हणाले, “शौर्याचे तेज आणि भक्तीचे तेज एकत्र आले, तेव्हा शिवकालात अलौकिक इतिहास घडला. म्हणूनच शिवराय व समर्थ यांचे चरित्र प्रकाशित करण्यासाठी कराडनगरीची निवड करण्यात आली. कारण ही नगरी दोन नद्यांच्या प्रितिसंगमावर वसलेली आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली आहे.”

आभार : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र अलोने यांनी केले. तर प्रशांत आवले यांनी आभार मानले. यावेळी संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी, जिल्हा सहसंघचालक शशिकांत फिरंगे, जिल्हा कार्यवाह वैभव डुबल यांच्यासह कराड व परिसरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शक्ती व संस्कारांचा संगम

“ श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींचा उद्देश केवळ धार्मिक नव्हता. सज्जन समाज हा दुर्बल असू नये, त्यांच्या मनातही पराक्रमाची ज्वाला पेटावी, हेच समर्थांचे खरे ध्येय होते,” असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.

समर्थ भक्तांचा सन्मान

सातारा जिल्ह्यात धर्मप्रसार आणि सेवा कार्यात सक्रीय असलेल्या समर्थ भक्तांचा सन्मान भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. कराड अर्बन बँकेच्यावतीने सुभाषराव जोशी आणि दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सन्मानकार्य पार पाडले. 

 

The post भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिव-समर्थ परंपरेचे अमूल्य योगदान first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6385/feed 0
श्री शिवप्रतिष्ठानतर्फे ‘गुरुपौर्णिमा उत्सव २०२५’चे आयोजन https://janswarashtra.com/archives/6353 https://janswarashtra.com/archives/6353#respond Sun, 13 Jul 2025 11:53:39 +0000 https://janswarashtra.com/?p=6353 कराड/प्रतिनिधी : – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या तेजस्वी परंपरेतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना गुरुस्थानी मानत त्यांचा पूजन सोहळा म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा उत्सव २०२५’ कराडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आयोजक : या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराड व पाटण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. संकल्प : या विशेष पूजन ... Read more

The post श्री शिवप्रतिष्ठानतर्फे ‘गुरुपौर्णिमा उत्सव २०२५’चे आयोजन first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराड/प्रतिनिधी : –

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या तेजस्वी परंपरेतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना गुरुस्थानी मानत त्यांचा पूजन सोहळा म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा उत्सव २०२५’ कराडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

आयोजक : या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराड व पाटण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संकल्प : या विशेष पूजन कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन करून त्यांच्या आशीर्वादाने राष्ट्ररक्षण व धर्मसंवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.

शिवप्रेमींना मिळणार राष्ट्रभक्ती व धर्मप्रेमाचे बळ : या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुनील (बापू) लाड, ज्येष्ठ धारकरी, कोल्हापूर (जि. सांगली) हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने शिवप्रेमींना राष्ट्रभक्ती व धर्मप्रेमाचे बळ मिळणार आहे.

वेळ व ठिकाण : मंगळवार, १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता श्री. कृष्णामाई सांस्कृतिक भवन (नवीन), सोमवारी पेठ, कराड इतिहास कार्यक्रम पार पडणार आहे.

आवाहन : या कार्यक्रमास सर्व शिवभक्त, तरुणाई आणि हिंदुत्वप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराड व पाटण विभागातर्फे करण्यात आले आहे.

The post श्री शिवप्रतिष्ठानतर्फे ‘गुरुपौर्णिमा उत्सव २०२५’चे आयोजन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6353/feed 0
छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर आधारित ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन  https://janswarashtra.com/archives/6346 https://janswarashtra.com/archives/6346#respond Sun, 13 Jul 2025 11:43:57 +0000 https://janswarashtra.com/?p=6346 कराड/प्रतिनिधी : –  श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने “हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय” आणि “श्री समर्थ चरित्र” या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन कराडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. वेळ व ठिकाण : सोमवार, १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा कराड येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात  संध्याकाळी ५.३० वाजता पार पडणार ... Read more

The post छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर आधारित ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन  first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराड/प्रतिनिधी : – 

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने “हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय” आणि “श्री समर्थ चरित्र” या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन कराडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

वेळ व ठिकाण : सोमवार, १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा कराड येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात  संध्याकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे.

मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषांमध्ये प्रसिद्ध : “हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय” या ग्रंथाचे लेखक साने गुरुजी असून, ही शंभूनाथ आवृत्ती मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषांमध्ये प्रसिद्ध होत आहे. तसेच “श्री समर्थ चरित्र” या ग्रंथाचे लेखक श्री. ज. म. करंदीकर (माजी संपादक, दैनिक केसरी) आहेत.

ग्रंथ प्रकाशन : या प्रकाशन सोहळ्यास केंद्रीय कार्यकारी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशित होणार आहेत.

प्रमुख उपस्थिती : या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. विक्रमसिंह मोहिते (सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशज, तळबीड) आणि श्री. योगेशबुवा रामदासी (कार्यवाह, श्री समर्थ सेवा मंडळ) हे उपस्थित राहणार आहेत.

आशीर्वचन : कार्यक्रमाला श्री गुरुनाथ महाराज कोटणीस (अध्यक्ष, श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड) यांचे आशीर्वचन लाभणार आहे.

उद्देश : या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे राष्ट्रनिर्माणकार्य आणि समर्थ रामदास स्वामींचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असून, या कार्यक्रमाला साहित्य, इतिहास आणि अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

The post छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर आधारित ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6346/feed 0
आषाढीला आवळ्यांतून अवतरले विठ्ठलरूप https://janswarashtra.com/archives/6272 https://janswarashtra.com/archives/6272#respond Sun, 06 Jul 2025 12:30:06 +0000 https://janswarashtra.com/?p=6272 कराडचे डॉ. राजेंद्र कंटक यांची आगळीवेगळी कलाकृती  राजेंद्र मोहिते/कराड : – शहाण्यांच्या मते “कला ही अनुभूती आहे”, आणि ही अनुभूती जेव्हा सृजनशीलतेच्या पातळीवर जाऊन नवे सौंदर्य घडवते, तेव्हा ती केवळ कला राहत नाही, ती उपासना होते. अशीच एक अनोखी कला-उपासना आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी अनुभवायला मिळाली ती डॉ. राजेंद्र अंजली अरविंद कंटक यांच्या रूपाने! देवमूर्तीतून ... Read more

The post आषाढीला आवळ्यांतून अवतरले विठ्ठलरूप first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराडचे डॉ. राजेंद्र कंटक यांची आगळीवेगळी कलाकृती 

राजेंद्र मोहिते/कराड : –

शहाण्यांच्या मते “कला ही अनुभूती आहे”, आणि ही अनुभूती जेव्हा सृजनशीलतेच्या पातळीवर जाऊन नवे सौंदर्य घडवते, तेव्हा ती केवळ कला राहत नाही, ती उपासना होते. अशीच एक अनोखी कला-उपासना आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी अनुभवायला मिळाली ती डॉ. राजेंद्र अंजली अरविंद कंटक यांच्या रूपाने!

देवमूर्तीतून निसर्गाशी साधला आत्मीय संवाद : वैद्यकीय सेवा आणि चित्रकला यांचा सुरेख संगम साधणारे डॉ. कंटक यांनी यंदा आषाढी एकादशीनिमित्त आपल्या बागेतील पडलेल्या आवळ्यांच्या फळांमधून तब्बल ६ फूट x २ फूट आकाराचे विठ्ठलरूप साकारले. त्यांच्यासाठी पडलेली फांदी ही केवळ निसर्गाची कृती नव्हती, तर ती होती साक्षात प्रेरणा! त्या क्षणिक वेदनेतूनच साकारलेली ही देवमूर्ती म्हणजे निसर्गाशी साधलेला एक आत्मीय संवाद होता.

कराड : विठ्ठलरूप साकारताना कलासैनिक डॉ. राजेंद्र अंजली अरविंद कंटक.

वर्ल्ड, लिम्का, आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद : चित्रकलेत अफाट योगदान देणाऱ्या डॉ. कंटक यांचे नाव आधीपासूनच वर्ल्ड, लिम्का, आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. त्यांनी फक्त पेन्सिलच्या साहाय्याने काढलेली 35,000 हून अधिक चित्रे ही त्यांच्या समर्पित तपश्चर्येची साक्ष आहेत. विशेषतः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रेखाटलेल्या 750 चित्रांनी रसिकांना भावविवश केलं आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली आहे.

व्यक्तिमत्त्वांचे चित्रण : राजकारण, समाजसुधारणा आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रांतील द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांचे चित्रण डॉ. कंटक यांनी आपल्या कुंचल्यातून जिवंत केलं आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कराड इत्यादी ठिकाणी त्यांनी 100 हून अधिक चित्रप्रदर्शने भरवली असून, त्यांच्या बाळासाहेबांवरील चित्रप्रदर्शनाला खुद्द उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनीही भेट दिली आहे.

संपूर्ण घरालाच बनवले कलामंदिर :  चित्रकलेबरोबरच मूर्तीकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, बागकाम आणि लाकडावरील नक्षीकाम यांतही त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या संपूर्ण घरालाच एक कलामंदिराचं स्वरूप दिलं गेलं असून, बाळासाहेबांसाठी स्वतंत्र दालन त्यांनी आपल्या घरात उभारलं आहे. ही कला म्हणजे केवळ शोभा नव्हे, तर ती आहे श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि सौंदर्यदृष्टी यांची एकात्मता.

नवोदितांसाठी दीपस्तंभ : ३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देताना कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा जपणाऱ्या डॉ. कंटक यांचं कार्य हे नवोदितांसाठी एक दीपस्तंभ ठरत आहे. आज त्यांची ओळख केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘कलासैनिक’ म्हणून होते आहे.

नैसर्गिक, श्रमसाध्य आणि अंतर्मनातून जन्मलेली कला : आजच्या घडीला, जेव्हा डिजिटल युगात कला ‘फिल्टर’च्या मर्यादेत अडकते आहे, तेव्हा डॉ. कंटक यांची ही नैसर्गिक, श्रमसाध्य आणि अंतर्मनातून जन्मलेली कला म्हणजे खऱ्या अर्थाने विठ्ठलभक्तीची साकार प्रतिमा ठरते. त्यांच्या या अनोख्या कलेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

The post आषाढीला आवळ्यांतून अवतरले विठ्ठलरूप first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6272/feed 0
जगन्नाथ रथयात्रा कराडमध्ये उत्साहात साजरी https://janswarashtra.com/archives/6185 https://janswarashtra.com/archives/6185#respond Sat, 28 Jun 2025 17:36:36 +0000 https://janswarashtra.com/?p=6185 प्रथमच आयोजन; संभाजी भिडे (गुरुजी) यांचा सहभाग, वातावरण भक्तीमय कराड/प्रतिनिधी : – ओडिशातील पुरी येथे दरवर्षी भव्यतेने पार पडणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर, अशीच रथयात्रा कराड शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन (ISKCON) तर्फे आयोजित या रथयात्रेला शहरातील नागरिक, भाविक आणि भक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला. ‘हरे कृष्ण, हरे राम’चा गजर ... Read more

The post जगन्नाथ रथयात्रा कराडमध्ये उत्साहात साजरी first appeared on Jan Swarashtra.

]]>
प्रथमच आयोजन; संभाजी भिडे (गुरुजी) यांचा सहभाग, वातावरण भक्तीमय

कराड/प्रतिनिधी : –

ओडिशातील पुरी येथे दरवर्षी भव्यतेने पार पडणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर, अशीच रथयात्रा कराड शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन (ISKCON) तर्फे आयोजित या रथयात्रेला शहरातील नागरिक, भाविक आणि भक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला.

‘हरे कृष्ण, हरे राम’चा गजर : शनिवारी करण्यात आलेल्या या रथयात्रेत भगवान श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची सुंदर आणि सजवलेली मूर्ती रथात विराजमान करण्यात आली होती. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने रथ ओढण्याचा मान मिळवण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. रथ ओढताना ‘हरे कृष्ण, हरे राम’ च्या गजरात शहरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

रथयात्रा मार्ग : रथयात्रेला शिवतीर्थ दत्त चौक येथून सुरुवात झाली. नंतर ही यात्रा भेदा चौक, कार्वे नाका मार्गे सिद्धार्थ मंगल कार्यालय, गोळेश्वर येथे पोहोचली. रथयात्रेमध्ये भाविकांसाठी विविध कीर्तन, भजन, ढोल-ताशांचे वादन, तसेच फूलांची सजावट आणि सांस्कृतिक झांज्या पाहायला मिळाल्या.

संभाजी भिडे (गुरुजी) यांची उपस्थिती : याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी देखील उपस्थिती लावून भगवान जगन्नाथाच्या चरणी अभिवादन केले. त्यांच्या उपस्थितीने रथयात्रेला अधिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन :  रथयात्रेनंतर सिद्धार्थ मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात भागवत कथा, प्रवचन, गीता ज्ञान, तसेच प्रसाद वितरण करण्यात आले. लहान मुलांसाठी कथाकथन आणि कृष्ण लीला यांचे सादरीकरण करण्यात आले होते.

अध्यात्मिक अनुभवाचा लाभ : या रथयात्रेचे आयोजन कराडसारख्या शहरात प्रथमच झाल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि कौतुकाचे वातावरण होते. अनेक भाविकांनी आपापल्या परिवारासह सहभागी होऊन या अनोख्या अध्यात्मिक अनुभवाचा लाभ घेतला.

The post जगन्नाथ रथयात्रा कराडमध्ये उत्साहात साजरी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6185/feed 0
हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक https://janswarashtra.com/archives/6114 https://janswarashtra.com/archives/6114#respond Fri, 20 Jun 2025 17:36:59 +0000 https://janswarashtra.com/?p=6114 कराडमध्ये शाळांना दिले राज ठाकरे यांचे पत्र कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रखर विरोधानंतर आणि वाढत्या जनक्षोभामुळे सरकारने या निर्णयामध्ये माघार घेत, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा ऐच्छिक करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरातील सर्व शाळांमध्ये ... Read more

The post हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराडमध्ये शाळांना दिले राज ठाकरे यांचे पत्र

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रखर विरोधानंतर आणि वाढत्या जनक्षोभामुळे सरकारने या निर्णयामध्ये माघार घेत, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा ऐच्छिक करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरातील सर्व शाळांमध्ये मनसेच्या वतीने हे पत्र प्रत्यक्ष भेट देऊन वितरित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : या उपक्रमाचे नेतृत्व मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार यांनी केले. यावेळी मनसेचे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, तसेच कार्यकर्ते विलास भोसले, प्रमोद भोसले, हणमंत वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सक्तीचा निर्णय मातृभाषा आणि संस्कृतीवर घाला : सरकारचा हिंदी भाषा सक्तीचा निर्णय हा महाराष्ट्रातील मातृभाषा आणि संस्कृतीवर घाला घालणारा असून, राज्यातील विद्यार्थ्यांवर परकीय भाषेचा बोजा लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

राज्यव्यापी आंदोलनाची तयारी : या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दर्शवत, सर्व मुख्याध्यापकांना एक परिपत्रक पाठवले आहे. या पत्रामध्ये हिंदी सक्तीच्या धोरणामागील विरोधाभास, शिक्षण स्वातंत्र्याचा भंग आणि मराठी भाषेच्या दुय्यमतेचा धोका यांचा ठाम उल्लेख करण्यात आला आहे. यासंदर्भात आज कराड शहरातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे पत्र प्रत्यक्ष भेट देऊन वितरित करण्यात आले.

पक्षाची भूमिका : पत्र वाटप करताना मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षक व शाळा प्रशासनासोबत संवाद साधत, हिंदी भाषा सक्तीविरोधातील पक्षाची भूमिका मांडली.

इशारा : “मराठी ही आमची मातृभाषा असून शिक्षणाचा प्राथमिक टप्पा मातृभाषेतूनच होणे आवश्यक आहे. शासनाने मराठी भाषेला दुय्यम ठरवण्याचा कोणताही प्रयत्न केला, तर मनसे त्याचा तीव्र विरोध करेल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

अस्मितेसाठीचा लढा : राज्य सरकारने यापूर्वीही जनभावनांचा आदर न करता निर्णय घेतल्याचे दाखले देत, मनसेने हा लढा केवळ भाषेचा नसून अस्मितेचा असल्याचे सांगितले. आगामी काळात हा विषय गाजण्याची शक्यता असून, मनसेच्या आगामी आंदोलनाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

The post हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6114/feed 0
नाग पूजेसाठी परवानगी न दिल्यास कराड येथे बेमुदत आंदोलन https://janswarashtra.com/archives/6102 https://janswarashtra.com/archives/6102#respond Thu, 19 Jun 2025 17:56:57 +0000 https://janswarashtra.com/?p=6102 सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने यांचा इशारा; अन्यथा राज्यभरातील वीज उपकेंद्रे बंद करून लढा तीव्र करणार  कराड/प्रतिनिधी : –  शिराळा तालुक्यातील पारंपरिक नागपंचमी उत्सवात जिवंत नाग पकडून पूजेला परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी शासनाने अटी व शर्ती घालून नियमन करावे, या मागणीसाठी शिराळा तालुक्यातील नागमंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थेट निवेदन पाठवले आहे. ... Read more

The post नाग पूजेसाठी परवानगी न दिल्यास कराड येथे बेमुदत आंदोलन first appeared on Jan Swarashtra.

]]>

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने यांचा इशारा; अन्यथा राज्यभरातील वीज उपकेंद्रे बंद करून लढा तीव्र करणार 

कराड/प्रतिनिधी : – 

शिराळा तालुक्यातील पारंपरिक नागपंचमी उत्सवात जिवंत नाग पकडून पूजेला परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी शासनाने अटी व शर्ती घालून नियमन करावे, या मागणीसाठी शिराळा तालुक्यातील नागमंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थेट निवेदन पाठवले आहे. या मागणीस २२ जूनपर्यंत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर २३ जून रोजी कराड तालुक्यातील विजयनगर येथील वीज उपकेंद्राबाहेर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने यांनी दिली.

पत्रकार परिषद : कराड शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जयदीप पाटील, विनोद कदम, विनायक माने, गणपती माने, चंद्रकांत पवार, अनिल माने यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलने, उपोषण, मोर्चे काढूनही केवळ आश्वासनेच : “न्यायालयाच्या आदेशामुळे शिराळा तालुक्यात जिवंत नाग पूजेला बंदी घालण्यात आली असून, ही परंपरा वर्षानुवर्षे जपली गेली असल्याचे सांगत श्री. माने म्हणाले, या पूजेला पुन्हा परवानगी मिळावी, अशी मागणी आम्ही २०१५ पासून सातत्याने करत आहोत. आम्ही याआधीही पाचवेळा आंदोलने, २९ दिवसांचे बेमुदत उपोषण, तसेच मोर्चे आयोजित केले. मात्र, या प्रश्नी सरकारकडून फक्त आश्वासने मिळाली, कृती काहीच झाली नाही.”

लोकसभेत विधेयक मंजूर करावे : “शासनाने यासंदर्भात विधेयक लोकसभेत सादर करून मंजूर करावे. यासाठी आम्हाला शिराळा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींचा पाठिंबा असल्याचे सांगत जयदीप पाटील म्हणाले, शिराळा ग्रामपंचायतीने यासंदर्भात ठरावही मंजूर केला आहे.”

…तर, वीज उपकेंद्रे बंद पाडू : “हा आंदोलनाचा फक्त पहिला टप्पा आहे. जर या उपोषणाचीही दखल घेण्यात आली नाही, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातील वीज उपकेंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा देत शासनाने जर आमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही तर, पारंपरिक श्रद्धा आणि सामाजिक प्रश्नांसाठी लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

निवेदनाद्वारे सरकारकडे केलेल्या मागण्या 

नाग पूजेबरोबरच विविध सामाजिक प्रश्नांवर देखील आंदोलकांनी आवाज उठवला आहे. यामध्ये जिवंत नाग पूजेची परवानगी अटी व शर्तींसह द्यावी, पुरुष शोषणविरोधी कायदा लागू करावा, कैकाडी समाजावरचे क्षेत्रीय बंधन उठवावे, ग्लोबल वॉर्मिंग विरोधी कायदा लागू करावा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वतंत्र कायदा करावा, जल व ध्वनी प्रदूषणविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा द्यावा, महागाई नियंत्रणासाठी स्वतंत्र कायदा करावा, रस्त्यांवरील गतिरोधकांचे (स्पीड ब्रेकर) नियमन करणारा कायदा लागू करावा, CGTMSE व MSC योजनेतून बेरोजगारांना कर्ज व सबसिडी मिळावी, नशाबंदी कायदा प्रभावीपणे लागू करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. 

The post नाग पूजेसाठी परवानगी न दिल्यास कराड येथे बेमुदत आंदोलन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6102/feed 0
कराड येथे गंगा दशहरा उत्सव उत्साहात साजरा https://janswarashtra.com/archives/6080 https://janswarashtra.com/archives/6080#respond Mon, 16 Jun 2025 16:55:42 +0000 https://janswarashtra.com/?p=6080 कराड/प्रतिनिधी : – कराड कन्यागत उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गंगा दशहरा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत हा उत्सव पार पडला. दहा दिवसांचा धार्मिक कार्यक्रम : या दहा दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांत दररोज सायंकाळी ६:३० वाजता कृष्णा नदीची आरती करण्यात आली. यावेळी मंत्रपुष्प, प्रसाद वाटप, तसेच ... Read more

The post कराड येथे गंगा दशहरा उत्सव उत्साहात साजरा first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराड/प्रतिनिधी : –

कराड कन्यागत उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गंगा दशहरा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत हा उत्सव पार पडला.

दहा दिवसांचा धार्मिक कार्यक्रम : या दहा दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांत दररोज सायंकाळी ६:३० वाजता कृष्णा नदीची आरती करण्यात आली. यावेळी मंत्रपुष्प, प्रसाद वाटप, तसेच नदी व घाट परिसरातील स्वच्छतेसाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले. यामध्ये स्थानिक नागरिक, महिला मंडळे यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

नागरिकांच्या सहभागामुळे उत्सव मंगलमय : कार्यक्रमामध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली श्रद्धा व निष्ठा व्यक्त केली. सर्व धार्मिक नागरिकांच्या सहभागामुळे हा उत्सव अधिकच मंगलमय झाला. या कार्यक्रमात सर्व धर्मप्रेमी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली श्रद्धा व निष्ठा व्यक्त केली. सर्व भाविकांच्या सहभागामुळे हा उत्सव अधिकच मंगलमय झाला. आयोजन यशस्वी करण्यासाठी उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. कराड कन्यागत उत्सव मंडळाने सर्व उपस्थित भाविकांचे आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले.

गंगा दशहरा उत्सवाचे महत्व

गंगा दशहरा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण गंगामातेला समर्पित आहे. हा सण ज्येष्ठ शुद्ध दशमी (मे-जून महिन्यात) साजरा केला जातो. याला गंगा अवतरण दिन म्हटले जाते, कारण या दिवशी देवी गंगा पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर भगीरथाच्या तपस्येमुळे अवतरली, असे पुराणांमध्ये सांगितले आहे. गंगाजलाचे स्नान केल्याने दश प्रकारचे पाप दूर होतात. या दिवशी गंगा नदीत स्नान, पूजन व दान केल्यास पापांपासून मुक्ती व पुण्याची प्राप्ती होते. याच्या मुख्य विधीमध्ये गंगाजलात स्नान, गंगा देवीची पूजा, दानधर्म केले जात. तसेच हा सण भक्तांमध्ये शुद्धीकरण व आध्यात्मिक उन्नती यांचे प्रतीक मानला जातो. 

The post कराड येथे गंगा दशहरा उत्सव उत्साहात साजरा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6080/feed 0