कराड/प्रतिनिधी : –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या तेजस्वी परंपरेतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना गुरुस्थानी मानत त्यांचा पूजन सोहळा म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा उत्सव २०२५’ कराडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
आयोजक : या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराड व पाटण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संकल्प : या विशेष पूजन कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन करून त्यांच्या आशीर्वादाने राष्ट्ररक्षण व धर्मसंवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
शिवप्रेमींना मिळणार राष्ट्रभक्ती व धर्मप्रेमाचे बळ : या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुनील (बापू) लाड, ज्येष्ठ धारकरी, कोल्हापूर (जि. सांगली) हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने शिवप्रेमींना राष्ट्रभक्ती व धर्मप्रेमाचे बळ मिळणार आहे.
वेळ व ठिकाण : मंगळवार, १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता श्री. कृष्णामाई सांस्कृतिक भवन (नवीन), सोमवारी पेठ, कराड इतिहास कार्यक्रम पार पडणार आहे.
आवाहन : या कार्यक्रमास सर्व शिवभक्त, तरुणाई आणि हिंदुत्वप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराड व पाटण विभागातर्फे करण्यात आले आहे.
