कराड येथे गंगा दशहरा उत्सव उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कराड कन्यागत उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गंगा दशहरा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत हा उत्सव पार पडला.

दहा दिवसांचा धार्मिक कार्यक्रम : या दहा दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांत दररोज सायंकाळी ६:३० वाजता कृष्णा नदीची आरती करण्यात आली. यावेळी मंत्रपुष्प, प्रसाद वाटप, तसेच नदी व घाट परिसरातील स्वच्छतेसाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले. यामध्ये स्थानिक नागरिक, महिला मंडळे यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

नागरिकांच्या सहभागामुळे उत्सव मंगलमय : कार्यक्रमामध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली श्रद्धा व निष्ठा व्यक्त केली. सर्व धार्मिक नागरिकांच्या सहभागामुळे हा उत्सव अधिकच मंगलमय झाला. या कार्यक्रमात सर्व धर्मप्रेमी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली श्रद्धा व निष्ठा व्यक्त केली. सर्व भाविकांच्या सहभागामुळे हा उत्सव अधिकच मंगलमय झाला. आयोजन यशस्वी करण्यासाठी उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. कराड कन्यागत उत्सव मंडळाने सर्व उपस्थित भाविकांचे आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले.

गंगा दशहरा उत्सवाचे महत्व

गंगा दशहरा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण गंगामातेला समर्पित आहे. हा सण ज्येष्ठ शुद्ध दशमी (मे-जून महिन्यात) साजरा केला जातो. याला गंगा अवतरण दिन म्हटले जाते, कारण या दिवशी देवी गंगा पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर भगीरथाच्या तपस्येमुळे अवतरली, असे पुराणांमध्ये सांगितले आहे. गंगाजलाचे स्नान केल्याने दश प्रकारचे पाप दूर होतात. या दिवशी गंगा नदीत स्नान, पूजन व दान केल्यास पापांपासून मुक्ती व पुण्याची प्राप्ती होते. याच्या मुख्य विधीमध्ये गंगाजलात स्नान, गंगा देवीची पूजा, दानधर्म केले जात. तसेच हा सण भक्तांमध्ये शुद्धीकरण व आध्यात्मिक उन्नती यांचे प्रतीक मानला जातो. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!