श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने “हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय” आणि “श्री समर्थ चरित्र” या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन कराडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
वेळ व ठिकाण : सोमवार, १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा कराड येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात संध्याकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे.
मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषांमध्ये प्रसिद्ध : “हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय” या ग्रंथाचे लेखक साने गुरुजी असून, ही शंभूनाथ आवृत्ती मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषांमध्ये प्रसिद्ध होत आहे. तसेच “श्री समर्थ चरित्र” या ग्रंथाचे लेखक श्री. ज. म. करंदीकर (माजी संपादक, दैनिक केसरी) आहेत.
ग्रंथ प्रकाशन : या प्रकाशन सोहळ्यास केंद्रीय कार्यकारी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशित होणार आहेत.
प्रमुख उपस्थिती : या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. विक्रमसिंह मोहिते (सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशज, तळबीड) आणि श्री. योगेशबुवा रामदासी (कार्यवाह, श्री समर्थ सेवा मंडळ) हे उपस्थित राहणार आहेत.
आशीर्वचन : कार्यक्रमाला श्री गुरुनाथ महाराज कोटणीस (अध्यक्ष, श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड) यांचे आशीर्वचन लाभणार आहे.
उद्देश : या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे राष्ट्रनिर्माणकार्य आणि समर्थ रामदास स्वामींचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असून, या कार्यक्रमाला साहित्य, इतिहास आणि अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.