स्वीकृत नगरसेवकपदी जयंतकाका पाटील, नरेंद्र लिबे व सुहास जगताप
कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची, तसेच स्वीकृत नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली. यामध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी पोपटराव साळुंखे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली, तर स्वीकृत नगरसेवकपदी लोकशाही आघाडीचे जयंतकाका पाटील, यशवंत विकास आघाडीचे नरेंद्र लिबे आणि भाजपचे सुहास जगताप यांची निवड करण्यात आली. या निवडी नगराध्यक्ष तथा निवड पिठासन अधिकारी राजेंद्रसिंह यादव यांनी अधिकृतरित्या जाहीर केल्या.













