डॉ. अशोक गुजर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आज कॅम्पस इंटरव्ह्यू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

जी. के. गुजर मेमोरिअल चारिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. अशोक गुजर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कराड येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या वतीने औषधनिर्मिती व संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीची पिरामल फार्मा, महाड या कंपनीसाठी कॅम्पस वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.

वेळ व ठिकाण : हे कॅम्पस इंटरव्ह्यू शनिवार (दि. १७) जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता संस्थेच्या परिसरात घेण्यात येणार आहेत.

…हे विद्यार्थी असतील मुलाखतीसाठी पात्र : उत्पादन कार्यकारी (प्रोडक्शन), तसेच गुणवत्ता आश्वासन (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स) या पदांसाठी भरती करण्यात येणार असून, २०२४ व २०२५ बॅचचे बी. फार्म व एम. फार्म उत्तीर्ण विद्यार्थी या मुलाखतीसाठी पात्र असतील.

आवाहन : इच्छुक विद्यार्थ्यांनी मुलाखतीस उपस्थित राहताना आपली सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील यांनी केले आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूबाबत अधिक माहितीसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी अतुल कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!