नाईकबा परिसरातील विविध गावांसह शाळांमध्ये वृक्षारोपण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सुझलॉन व ज्ञानदीप संस्थेचा उपक्रम

कराड/प्रतिनिधी : –

सुझलॉन फाउंडेशन, पुणे आणि ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, कराड यांच्यावतीने ढेबेवाडी परिसरातील विविध शाळा आणि गावांमध्ये वृक्षारोपण करीत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वृक्षारोपन करताना संस्थेच्या प्रतिनिधींसह उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढीसाठी मार्गदर्शन केले.

सहभाग : आंबवडे खुर्द, जौंजाळवाडी, नाईकबा आणि बनपूरी येथील जिल्हा परिषद शाळा आणि गाव परिसरातील वृक्षारोपण अभियानात स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राम विकास समिती सदस्य, बचत गटातील महिला, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक व पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला.

जंगली झाडांची लागवड व फळाझाडांचे रोपण : सुझलॉन फाउंडेशनचे संजय शिवदास यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा हा उपक्रम विविध शाळांमध्ये आणि गावांमध्ये राबवला गेला. यामध्ये जंगली झाडांची लागवड आणि विविध फळांच्या झाडांचे रोपण केले गेले. विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी आणि शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

पर्यावरणाचे महत्त्व : विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन श्रमदान करुन वृक्षारोपन केले. वृक्षारोपण अभियानात स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्राम विकास समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. विद्यार्थ्यांनी आनंदाने झाडांची लागवड केली आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावून घेतले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे सांगितले.

जैवविविधतेला चालना : ज्ञानदीप संस्थेच्या प्रतिनिधींनी वृक्षारोपणाच्या प्रक्रिया, त्याचे फायदे आणि पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्दे सांगितले. वृक्षारोपणासाठी निवडलेली झाडे विशेषत: स्थानिक आणि पर्यावरणाला उपयुक्त अशी होती, ज्यामुळे त्या परिसराच्या जैवविविधतेला चालना मिळेल. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने या अभियानात भाग घेतला आणि वृक्षारोपण करतांना पर्यावरणविषयक गोष्टींबद्दल विचार मांडले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!