कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची निवड 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

ऐतिहासिक स्मारकांना अभिवादन करून अध्यक्षीय कार्यकाळाची सुरुवात

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नुकतीच नामदेवराव पाटील यांची निवड झाली. या निवडीनंतर त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात पक्ष परंपरेनुसार शहरातील ऐतिहासिक स्मारकांना अभिवादन करून केली.

अभिवादन : रविवार, दि. 21 रोजी सकाळी नामदेवराव पाटील यांनी शहरातील दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. शिवरायांचे आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर महात्मा गांधी स्मारकासही त्यांनी अभिवादन केले.

पक्ष बळकट करण्याचा निर्धार :  प्रीतिसंगमावरील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर पाटण कॉलनीतील स्व. प्रेमीलाकाकी चव्हाण व स्व. आनंदराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या विकासदृष्टीचा आदर्श घेऊन काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा निर्धार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व महात्मा जोतिराव फुले स्मारकास त्यांनी भेट देऊन सामाजिक न्याय, शिक्षण प्रसार व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्य करण्याची ग्वाही दिली.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमाला इंद्रजीत चव्हाण, झाकीर पठाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, सुभाष पाटील, संजय तडाखे, सुरेश भोसले, शिवाजीराव जमाले, रवी बडेकर, वैभव थोरात, शब्बीर मुजावर, दिपक पाटील, भगवान सुतार, अवधूत पाटील, मुजीर इनामदार, तानाजी घारे, पंकज पिसाळ, एल.जे. देसाई यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!