कराड/प्रतिनिधी : –
आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेने दि. 31 मार्च 2025 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाची ऑडीट पूर्व सांपत्तिक स्थिती नुकतीच जाहीर केली. बँकेने दि. 31 मार्च 2025 अखेर नेट एन.पी.ए. सलग 20 व्या वर्षी शून्य टक्के (0%) ठेवण्यात यश मिळविले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अशोक पाटील यांनी दिली.
रिझर्व बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता : चेअरमन अशोक पाटील म्हणाले, बँकेने ‘भक्कम आर्थिक स्थिती व उत्तम व्यवस्थापित बँक (FSWM)’ बाबत रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची यावर्षीही पूर्तता केली आहे. बँकेचे भागभांडवल 4 कोटी 98 लाख असुन निधी 26 कोटी 57 लाख आहेत. बँकेच्या एकून ठेवी 180 कोटी 63 लाख असून कर्जाचे वाटप 132 कोटी 33 लाख झाले आहे. बँकेची गुंतवणुक 61 कोटी 54 लाख आहे. बँकेस ढोबळ नफा 1 कोटी 64 लाख झाला असून निव्वळ नफा 57 लाख 46 हजार झाला आहे. बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. 1 टाक्यांपेक्षा कमी असून प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 861 टक्के आहे.
लाभांशाची परंपरा कायम : बँकेची सभासदांना सातत्याने लाभांश देण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात येणार आहे. बँकेचे संस्थापक आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब यांनी घालून दिलेल्या धोरणाप्रमाणे संचालक मंडळ निर्णय घेत असते. बँकेस माजी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन मुकुंदराव कुलकर्णी व संचालक हेमंत ठक्कर, अॅड. चंद्रकांत कदम, नंदकुमार बटाणे, बाळासाहेब जगदाळे, सागर पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.जी. मोमीन उपस्थित होते.
