कराड/प्रतिनिधी : –
कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या १२ व्या स्मृतिदिनी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
अभिवादन : ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, श्री. पृथ्वीराज भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अशोक गुजर, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तसीलदार भाऊसाहेब राठोड, मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, सयाजी यादव, जितेंद्र पाटील, दत्तात्रय देसाई, संजय पाटील, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, जी. डी. मोरे, धोंडिराम जाधव, बाबासाहेब शिंदे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत देसाई, उद्योजक आर.टी. स्वामी, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, ॲड. विजय पाटील, अनिल बनसोडे, प्रकाश पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक रामभाऊ माळी, भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. स्वाती पिसाळ, राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, माजी तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराड शहराध्यक्षा सौ. सुषमा लोखंडे, मुकुंद चरेगावकर, प्रमोद पाटील, नंदाताई विभुते, संपतराव थोरात, कराडचे माजी नगरसेवक महादेव पवार, सुहास जगताप, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, मलकापूरचे माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, राजू मुल्ला, कान्हा लाखे, जयरामस्वामी मठाचे विठ्ठल महाराज व वारकरी संप्रदायातील मंडळी, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, कोयना वसाहतीचे उपसरपंच उमेश कुलकर्णी, जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, रमेश लवटे, संजय शेवाळे, अरविंद पाटील, दिलीपराव मोरे, सूरज शेवाळे, संग्राम पाटील, विक्रम साळुंखे, डॉ. सुशील सावंत, वसीम मुल्ला, किरण मुळे, राहुल पाटील, विकास माने, विलास देसाई, सचिन जगताप, श्रीकांत घोडके, बाळासाहेब जगताप, हेमंत पाटील, हंबीरराव पाटील, राजू देशमुख, ह.भ.प. कृष्णत शिंदे महाराज, दादा शिंगण, रमेश मोहिते, अधिकराव पाटील, हौसेराव पाटील, दिलीप पाटील, दादा देवकर, अभिषेक भोसले, देवानंद पाटील, गजेंद्र पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, दिपक गावडे, दादासो पाटोळे, मनोज पाटील, सुनील पवार, विजय मोहिते, जनार्दन डुबल आदींसह मान्यवर उपस्थित होते.
