कराड/प्रतिनिधी : –
येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना त्यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत स्व. आप्पासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अभिवादन : याप्रसंगी संचालक संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे.डी.मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, वैभव जाखले, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील आदींसह मान्यवरांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कृष्णाकाठी समृद्धी : कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून आप्पासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. आप्पासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे कृष्णाकाठी समृद्धी आली. सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. अशा भावना मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केल्या. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
