सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची मंगळवार, दि. ५ ऑगस्ट रोजी १२ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार आहे.

कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व : स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.

विविध कार्यक्रमांचे आयोजन : त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी (ता. ५) कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. तसेच स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!