पाणी टंचाईग्रस्त २५ गावांचा आराखडा तयार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची माहिती; दक्षिणमधील १३ तर, उत्तरेतील १२ गावांचा गावांचा समावेश

कराड/प्रतिनिधी : –

तालुक्यात जाणवणार्‍या पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर टंचाईच्या छायेत असललेल्या २५ गावांचा प्रामुख्याने आराखडा तयार केला आहे. त्यात कराड दक्षिण विधानसभेतील १३ तर, उत्तरेतील १२ गावांचा समावेश आहे. त्या गावात कामही चालू आहे. त्याशिवाय तालुक्यातील ४२ गावांचा टंचाई आराखडा स्वतंत्रपणे केला आहे. त्यात दक्षिणेतील २१ तर, उत्तरेतील २१ गावांवर लक्ष आहे, अशी माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

आढावा बैठक : कराड तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून एसडीआरचा आढावा घेतला. बैठकीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलादर कल्पना ढवळे, उपअभियंता प्रमोद चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

२५ गावात प्रत्यक्ष टंचाई घोषित : आमदार डॉ. भोसले म्हणाले, तालुक्यात टंचाईच्या आराखड्यात जवळपास ४२ गावांचा समावेश आहे दक्षिण, उत्तरेत प्रत्येकी २१ गावे आहेत. प्रत्यक्ष टंचाई घोषित केलेली गावे २५ आहेत. त्यामुळे प्रामुख्यान त्या गावांत टंचाईचा आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी चार टँकर प्रशासनाने टंचाई जनक स्थितीत दिले होते. त्या पध्दतीची तयारी यावर्षी केली आहे. टंचाई निर्माण होऊ शकते तिथे आधीपासूनच प्रशासन तयारीत आहे. उपाययोजनांसाठी समन्वयातून काम सुरू आहेत.

उंडाळे योजनेसाठी 70 लाखांचा खर्च : उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्याबाबतचे नियोजन आहे. त्यासाठी ७० लाख खर्चाचा प्रस्ताव मिळाला आहे. त्याला जिल्हा नियाेजनमधून मंजुरी घेवू. ओंड येथे बंदिस्त पाईपलाईनने पाणीपुरवठा होण्यासाठीची योजना आहे. ज्याला तांत्रिक अडचणीमुळे ती प्रलंबित आहे. सरकार पातळीवर मोठ्या प्रमाणावर त्याचा पाठपुरावा केल्याने त्याला हिरवा कंदील आहे. बंदीस्त पाईपलाईनने ओंडला पाणीपुरवठा झाल्यास गावाला कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्याचा प्राथमिक आराखडा २५ कोटींचा असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.

२५ टक्के काम पूर्ण : तालुक्यात पूर्ण न झालेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. मतदारसंघांत ९० गावांना पाणी योजना मंजूर असल्याचे सांगत आमदार भोसले म्हणाले, त्यापैकी अनेक गावांत २५ टक्केच काम पूर्ण झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना पूर्ण न झालेल्या योजनांची माहिती घेवून पाच एप्रिलला जिल्ह्याची टंचाईची बैठकीत पालकमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी संगितले.

ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव क्रीडा संकुलासाठी ३५ कोटींचा निधी

ऑलींम्पीकवीर (स्व.) खशाबा जाधव क्रीडा संकुलला राज्य सरकाने २५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यात आणखी १० कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे संकुलाला ३५ कोटींचा निधी मिळणार आहे. दोन आठवड्यात त्याची निविदा प्रक्रियेपर्यंत पुढे जाऊ, तशा सूचना आ. भोसले यांनी तहसीलदार ढवळे यांना दिल्या आहेत.

कराडला महसूल कॉम्प्लेक्स व महसूल भवन

कराडला महसूल कॉम्प्लेक्स व्हावे, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असून, त्यालाही सकारात्मक प्रतिसाद हे. त्याच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना केली आहे. तेथेच महसूल भवनही येत्या काळात करायचे आहे.

पंचायत समिती कार्यालयासाठी २५ कोटी

पंचायत समितीचे मुख्य कार्यालय होण्यासाठीही प्रयत्नशील आहे. त्यासाठी ३५ कोटींची मागणी केली होती. त्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुचनेवरून तो प्रस्ताव २५ कोटीचा केला आहे. त्यातही १५ कोटी तातडीने देऊ आणि वर्षभरात काम पूर्ण झाल्यावर वाढीव १० कोटींचा निधी देवू, असेही आ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!