‘महिला मर्चंट’चा २०० कोटींच्या ठेवीचा टप्पा पार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

संस्थेस ६ कोटी ७५ लाखांचा एकूण नफा; अग्रगण्य संस्थां म्हणून ओळख – सौ. भारती मिणीयार 

कराड/प्रतिनिधी : –

मर्चंट ग्रुपचे अध्यक्ष श्री सत्यनारायण मिणीयार यांच्या नेतृत्वाखाली व संस्थापक सौ. भारती मिणीयार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या व पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक अशी ओळख निर्माण केलेल्या महिला मर्चंट नागरी सह. पतसंस्था मर्या. कराड या संस्थेने २०० कोटी ठेवींचा टप्पा पार केला असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक सौ. भारती मिणीयार यांनी दिली.

पावणेसात कोटींचा एकूण नफा : तसेच गतवर्षीच्या ठेवीत १५ टक्के, तर नफयामध्ये २५ टक्क्यांची भरघोस वाढ झाली असून संस्थेस एकूण नफा ६ कोटी ७५ लाख इतका झाला आहे. तसेच नेट एन.पी.ए.चे प्रमाणदेखील ‘शून्य’ टक्के कायम राखण्यास संस्थेने यश मिळवले असल्याचेही सौ. मिणीयार यांनी सांगितले.

पारदर्शक कारभारामुळे प्रगती : संस्थेच्या चेअरमन सौ. कविता पवार म्हणाल्या, सभासदांचे हित समोर ठेवून संस्थेचा पारदर्शी कारभार सुरू असल्याने संस्थेने आपल्या व्यवसायाची प्रगती साध्य करण्यात यश मिळवले.

३३५ कोटींचा व्यवसाय : दि. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या एकूण ठेवी २०५ कोटी झाल्या व कर्जे १३० कोटी इतकी झाली आहेत. सभासद संख्या १८६०० च्यावर असून वसूल भागभांडवल ११ कोटी, गुंतवणूक १२५ कोटी व एकूण निधी ३३ कोटी इतका असल्याचे सौ. पवार यांनी सांगितले.

संस्थेची गुणात्मक प्रगती : त्याचबरोबर एकत्रित व्यवसाय ३३५ कोटी इतका झाला आहे. संस्थेच्या एकूण शाखा ११ असून त्यापैकी स्वमालकीच्या वास्तू ७ आहेत. शाखा वारूंजी लवकरच नवीन वास्तूत स्थलांतर होत आहे. संस्थेने केलेली प्रगती केवळ आकडेवारीमधील नसून ती गुणात्मक असल्याचेही सौ. पवार यांनी सांगितले.

बँकिंग सुविधा उपलब्ध : तसेच संस्थेच्या संपूर्ण शाखा संगणकीकृत असून सीबीएस प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांसाठी मोबाईल बँकींग, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, मोबाईल अॅप, मोबाईल रिचार्ज एसएमएस व अद्यावत लॉकर सुविधा यासारख्या अनेक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

उपस्थिती व आभार : यावेळी संस्थेच्या व्हा. चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले, संचालक, व्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या सर्व सभासदांनी संस्थेस केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे व्हा. चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!