आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत मोहिते यांचा उपक्रम
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील युवा नेते प्रशांतदादा मोहिते मित्र परिवार यांच्या वतीने ‘अतुलसंस्कार’ या उपक्रमांतर्गत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दोन शाळांचा सहभाग : या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कासेगाव शिक्षण संस्थेच्या बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ब्रह्मदास विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

70 विद्यार्थ्यांनी रेखाटले अक्षर : पहिली ते चौथी आणि पाचवी नववी या गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यात ब्रह्मदास विद्यालयातील ४०, तर जिल्हा परिषद शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
परीक्षण : जिल्हा परिषद व ब्रम्हदास विदयालयातील शिक्षक, शिक्षिका यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी युवा नेते प्रशांतदादा मोहिते यांच्यासह उदयसिंह मोहिते, विलास मोहिते, धनाजी मोहिते, हणमंत मोहिते, पै. सुहास जाधव बंडा, नितीन मोहिते, विजय मोहिते, नितीन मोहिते, महादेव मोहिते, पोपट सर, जिल्हा परिषद व ब्रम्हदास विदयालयाचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
आमचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात. ‘अतुलसंस्कार’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लवकरच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
– प्रशांतदादा मोहिते
