कराड/प्रतिनिधी : –
गेली अनेक वर्षे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास उच्चतम दर देऊन, शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेत अदा केली आहेत. कारखान्याच्या काट्यामध्ये अचूकता आहे. त्यामुळे सह्याद्रि’च्या सभासदांचा पी.डी. पाटील पॅनलवर विश्वास आहे, असे मत कारखान्याच चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
सभासद संवाद बैठक : सैदापूर (ता. कराड) येथील सभासदांच्या संवाद बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : बैठकीस राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, जयंतकाका पाटील, शंकरराव खापे, ॲड. संजय जगदाळे, रामदास पवार, बाळासाहेब सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
…यावरून विश्वासार्हता सिद्ध होते : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक नेते मंडळींकडून आपल्या पी. डी. पाटील पॅनलला पाठिंबा मिळत आहे, असे सांगत चेअरमन बाळासाहेब पाटील म्हणाले, यावरून कारखान्यावर असणारी विश्वासार्हता सिद्ध होते. कारखान्याने नेहमीच उच्च दराची परंपरा कायम ठेवली आहे. त्याचबरोबर वेळेत बिले अदा करण्यामुळे आपल्या पी. डी. पाटील पॅनलवर सभासदांचा विश्वास आहे.
ऊस तोडीचा प्रश्न मार्गी : गेली 50 वर्षे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील उसाचे गाळप होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बागायत झाल्याने ऊस क्षेत्र वाढले आहे, असे सांगत अजितराव पाटील-चिखलीकर म्हणाले, तसेच उसाचे हेक्टरी उत्पन्न देखील वाढले आहे. त्यामुळे ऊस तोडणीस विलंब होत होता. कारखान्याने विस्तार करण्याचा निर्णय घेतला. विस्तारवाढीचे काम पूर्ण झाले असून पुढील हंगामापासून जवळपास 13 हजार टन गळीत होणार असून ऊस तोडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
उपस्थिती : याप्रसंगी राजेंद्र पाटील, ताजुद्दीन मुल्ला, दीपक लादे, प्रशांत यादव, उदय थोरात, नेताजी चव्हाण, विखे नलवडे, नागेश मिसाळ, धनाजी श्रीपती जाधव, आनंदराव देसाई, संभाजी भार्गव जाधव, अशोक श्रीरंग जाधव, श्रीरंग जाधव, पांडुरंग जाधव, तानाजीराव माळी, नानासो जाधव, सचिन पाटील, शरद जाधव, मानसिंग जाधव, उपसरपंच अनिल जाधव, विकास जाधव, हिंदुराव जाधव, नितीन कणसे, दिलीप जाधव, बाळासाहेब जाधव, संजय जाधव, उत्तम कणसे, सलीम मुल्ला, अशोक माळी, रमेश जाधव, मानसिंग जाधव, दिलीप जाधव, अशोक जाधव, सुनील जाधव, पांडुरंग जाधव, नारायण कोकरे, धनाजीराव जाधव, विलास जाधव, अधिकराव काशीद, प्रमोद जाधव, कुमार जाधव, तसेच सभासद व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
