राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोयना वसाहत येथील कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आ. डॉ. भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन : प्रारंभी, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ते कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहिले. याठिकाणी केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.













