“यशवंत” कृषी प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी; यशवंत कृषी प्रदर्शनासंदर्भात सभा 

कराड/प्रतिनिधी : –

येथील शेती उत्पन्न बाजार समिती आवारात यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आयोजन करावे. या प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हास्तरीय समितीची सभा : यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. यासंबंधी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

मान्यवरांची उपस्थिती : या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी समिर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, विजयकुमार कदम आदी उपस्थित होते.

सेंद्रीय शेतीबाबत जनजागृती करा : कृषी प्रदर्शनामध्ये सेंद्रीय शेतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, विविध कृषी उत्पादनावर आधारित विविध गावांमध्ये ठराविकच उत्पादन घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून. याबाबतही प्रदर्शनामध्ये जनजागृती करावी. प्रदर्शनामध्ये सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभे करुन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!