जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी; आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
कराड/प्रतिनिधी : –
किल्ले प्रतापगड येथे रविवार, दि. 8 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.

आढावा बैठक : जिल्हाधिकारी कार्यालय शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्याबाबत आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे-पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

थ्रीडी मॉडेल तयार करा : प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठीच्या आराखड्याचे थ्रीडी मॉडेल तयार करावे, अशा सूचना देत जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, त्याचबरोबर किल्ल्याची माहितीही याबरोबर देण्यात यावी. तसेच किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या कामांच्या माध्यमातून प्रतापगड परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती पर्यटकांना देण्यात यावी.












