आंतरराष्ट्रीय - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Thu, 19 Jun 2025 17:59:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png आंतरराष्ट्रीय - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 नाग पूजेसाठी परवानगी न दिल्यास कराड येथे बेमुदत आंदोलन https://janswarashtra.com/archives/6102 https://janswarashtra.com/archives/6102#respond Thu, 19 Jun 2025 17:56:57 +0000 https://janswarashtra.com/?p=6102 सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने यांचा इशारा; अन्यथा राज्यभरातील वीज उपकेंद्रे बंद करून लढा तीव्र करणार  कराड/प्रतिनिधी : –  शिराळा तालुक्यातील पारंपरिक नागपंचमी उत्सवात जिवंत नाग पकडून पूजेला परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी शासनाने अटी व शर्ती घालून नियमन करावे, या मागणीसाठी शिराळा तालुक्यातील नागमंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थेट निवेदन पाठवले आहे. ... Read more

The post नाग पूजेसाठी परवानगी न दिल्यास कराड येथे बेमुदत आंदोलन first appeared on Jan Swarashtra.

]]>

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने यांचा इशारा; अन्यथा राज्यभरातील वीज उपकेंद्रे बंद करून लढा तीव्र करणार 

कराड/प्रतिनिधी : – 

शिराळा तालुक्यातील पारंपरिक नागपंचमी उत्सवात जिवंत नाग पकडून पूजेला परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी शासनाने अटी व शर्ती घालून नियमन करावे, या मागणीसाठी शिराळा तालुक्यातील नागमंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थेट निवेदन पाठवले आहे. या मागणीस २२ जूनपर्यंत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर २३ जून रोजी कराड तालुक्यातील विजयनगर येथील वीज उपकेंद्राबाहेर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने यांनी दिली.

पत्रकार परिषद : कराड शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जयदीप पाटील, विनोद कदम, विनायक माने, गणपती माने, चंद्रकांत पवार, अनिल माने यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलने, उपोषण, मोर्चे काढूनही केवळ आश्वासनेच : “न्यायालयाच्या आदेशामुळे शिराळा तालुक्यात जिवंत नाग पूजेला बंदी घालण्यात आली असून, ही परंपरा वर्षानुवर्षे जपली गेली असल्याचे सांगत श्री. माने म्हणाले, या पूजेला पुन्हा परवानगी मिळावी, अशी मागणी आम्ही २०१५ पासून सातत्याने करत आहोत. आम्ही याआधीही पाचवेळा आंदोलने, २९ दिवसांचे बेमुदत उपोषण, तसेच मोर्चे आयोजित केले. मात्र, या प्रश्नी सरकारकडून फक्त आश्वासने मिळाली, कृती काहीच झाली नाही.”

लोकसभेत विधेयक मंजूर करावे : “शासनाने यासंदर्भात विधेयक लोकसभेत सादर करून मंजूर करावे. यासाठी आम्हाला शिराळा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींचा पाठिंबा असल्याचे सांगत जयदीप पाटील म्हणाले, शिराळा ग्रामपंचायतीने यासंदर्भात ठरावही मंजूर केला आहे.”

…तर, वीज उपकेंद्रे बंद पाडू : “हा आंदोलनाचा फक्त पहिला टप्पा आहे. जर या उपोषणाचीही दखल घेण्यात आली नाही, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातील वीज उपकेंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा देत शासनाने जर आमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही तर, पारंपरिक श्रद्धा आणि सामाजिक प्रश्नांसाठी लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

निवेदनाद्वारे सरकारकडे केलेल्या मागण्या 

नाग पूजेबरोबरच विविध सामाजिक प्रश्नांवर देखील आंदोलकांनी आवाज उठवला आहे. यामध्ये जिवंत नाग पूजेची परवानगी अटी व शर्तींसह द्यावी, पुरुष शोषणविरोधी कायदा लागू करावा, कैकाडी समाजावरचे क्षेत्रीय बंधन उठवावे, ग्लोबल वॉर्मिंग विरोधी कायदा लागू करावा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वतंत्र कायदा करावा, जल व ध्वनी प्रदूषणविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा द्यावा, महागाई नियंत्रणासाठी स्वतंत्र कायदा करावा, रस्त्यांवरील गतिरोधकांचे (स्पीड ब्रेकर) नियमन करणारा कायदा लागू करावा, CGTMSE व MSC योजनेतून बेरोजगारांना कर्ज व सबसिडी मिळावी, नशाबंदी कायदा प्रभावीपणे लागू करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. 

The post नाग पूजेसाठी परवानगी न दिल्यास कराड येथे बेमुदत आंदोलन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6102/feed 0
ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण https://janswarashtra.com/archives/5953 https://janswarashtra.com/archives/5953#respond Thu, 05 Jun 2025 16:36:52 +0000 https://janswarashtra.com/?p=5953 क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कौतुक; कामाला तातडीने गती देण्याचे प्रशासनाला आदेश कराड/प्रतिनिधी : – ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते. कामाला गती देण्याचे आदेश : यावेळी ... Read more

The post ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण first appeared on Jan Swarashtra.

]]>
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कौतुक; कामाला तातडीने गती देण्याचे प्रशासनाला आदेश

कराड/प्रतिनिधी : –

ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते.

कामाला गती देण्याचे आदेश : यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे कौतुक करुन, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

नव्या पिढीला प्रेरणा : गोळेश्वर येथील पै. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पै. खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा : या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली होती. तसेच शासनस्तरावर संकुलाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

आंतरराष्ट्रीय स्टँटर्डनुसार निर्मिती : मुंबईत क्रीडामंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आ. डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडामंत्री ना. भरणे यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुंबईतील शशी प्रभू ॲन्ड असोसिएटस्‌ यांनी या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला असून, बैठकीत सिनीअर आर्किटेक्ट अमृता पारकर यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय स्टँटर्ड लक्षात घेऊन हा आराखडा तयार केल्याचे पारकर यांनी सांगितले.

तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही : दरम्यान, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, या क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या संकुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी. तसेच आवश्यक त्या पातळीवर तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

उपस्थिती : याप्रसंगी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप उपस्थित होत्या.

The post ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5953/feed 0
ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण https://janswarashtra.com/archives/5940 https://janswarashtra.com/archives/5940#respond Thu, 05 Jun 2025 12:33:42 +0000 https://janswarashtra.com/?p=5940 क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कौतुक; कामाला तातडीने गती देण्याचे प्रशासनाला आदेश कराड/प्रतिनिधी : – ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते. कामाला गती देण्याचे आदेश : यावेळी ... Read more

The post ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण first appeared on Jan Swarashtra.

]]>
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कौतुक; कामाला तातडीने गती देण्याचे प्रशासनाला आदेश

कराड/प्रतिनिधी : –

ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते.

कामाला गती देण्याचे आदेश : यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे कौतुक करुन, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

नव्या पिढीला प्रेरणा : गोळेश्वर येथील पै. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पै. खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा : या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली होती. तसेच शासनस्तरावर संकुलाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

आंतरराष्ट्रीय स्टँटर्डनुसार निर्मिती : मुंबईत क्रीडामंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आ. डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडामंत्री ना. भरणे यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुंबईतील शशी प्रभू ॲन्ड असोसिएटस्‌ यांनी या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला असून, बैठकीत सिनीअर आर्किटेक्ट अमृता पारकर यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय स्टँटर्ड लक्षात घेऊन हा आराखडा तयार केल्याचे पारकर यांनी सांगितले.

तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही : दरम्यान, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, या क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या संकुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी. तसेच आवश्यक त्या पातळीवर तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

उपस्थिती : याप्रसंगी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप उपस्थित होत्या.

The post ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5940/feed 0
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली https://janswarashtra.com/archives/5379 https://janswarashtra.com/archives/5379#respond Sat, 26 Apr 2025 05:04:26 +0000 https://janswarashtra.com/?p=5379 दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली कराड/प्रतिनिधी : –  पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी प्रीतिसंगम घाटावर आदरांजली वाहण्यात येणार आहे. वेळ व ठिकाण : या हल्ल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या भ्याड हल्याच्या निषेधार्थ विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता प्रीतिसंगम ... Read more

The post दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली first appeared on Jan Swarashtra.

]]>

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली

कराड/प्रतिनिधी : – 

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी प्रीतिसंगम घाटावर आदरांजली वाहण्यात येणार आहे.

वेळ व ठिकाण : या हल्ल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या भ्याड हल्याच्या निषेधार्थ विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता प्रीतिसंगम घाटावर मेणबत्या प्रज्वलीत करुन हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

आवाहन : कराड शहर व परिसरातील सर्व आबालवृध्दांनी या भ्याड हल्याच्या निषेधार्थ आयोजित आदरांजली कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने अध्यक्ष निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले आहे.

The post दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5379/feed 0
पृथ्वीराज चव्हाणांनी थेट परराष्ट्र सचिवांना केला फोन https://janswarashtra.com/archives/5359 https://janswarashtra.com/archives/5359#respond Thu, 24 Apr 2025 12:29:54 +0000 https://janswarashtra.com/?p=5359 श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी – पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी कराड/प्रतिनिधी : – जम्मू काश्मीरमध्ये कराड व सातारा येथील पर्यटक अडकल्या माहिती मिळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची थेट त्यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच याप्रश्नी थेट परराष्ट्र सचिवांना फोन करून जम्मू काश्मीरमधील पहलगाम, श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांना ... Read more

The post पृथ्वीराज चव्हाणांनी थेट परराष्ट्र सचिवांना केला फोन first appeared on Jan Swarashtra.

]]>
श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी – पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

कराड/प्रतिनिधी : –

जम्मू काश्मीरमध्ये कराड व सातारा येथील पर्यटक अडकल्या माहिती मिळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची थेट त्यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच याप्रश्नी थेट परराष्ट्र सचिवांना फोन करून जम्मू काश्मीरमधील पहलगाम, श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांना सुखरूप मुंबईला पोहोचावाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे.

कराडचे पर्यटक अडकले : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ ते ३० पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकले असून त्यामध्ये कराडच्या पाच पर्यटकांचा समावेश आहे.

महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क : कराडचे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती श्री. कुलकर्णी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. यावेळी पृथ्वीराज बाबांनी श्री. कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली.

कराडला सुरक्षित पोहचण्यासाठी प्रयत्न : तुम्हाला मदत नक्की मिळेल. तुम्ही लवकरात लवकर कराडला पोहचाल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पृथ्वीराजबाबांनी दिले.

पर्यटकांची यादी पाठवली : श्री. कुलकर्णी यांच्या सोबत बोलणे झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ परराष्ट्र सचिव व महाराष्ट्राच्या सचिवांशी संपर्क साधून कराडसह महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटकांना लवकरात लवकर आणण्यासाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली. प्रशासनाने जलद यंत्रणा कामाला लावावी, असे सांगून कराड व सातारामधील अडकलेल्या पर्यटकांची यादी सचिवांना पाठवली आहे.

दिल्लीत राहण्याची व्यवस्था : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महेश कुलकर्णी यांना संपर्क करून माहिती दिली. अगदी डायरेक्ट पुणे किंवा मुंबईपर्यंत जरी व्यवस्था नाही झाली, तरी दिल्लीपर्यंत तरी या. तुमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था दिल्लीत केली जाईल, असा आधारही पृथ्वीराजबाबांनी कराडच्या कुलकर्णी व क्षीरसागर कुटुंबियांना दिला आहे.

The post पृथ्वीराज चव्हाणांनी थेट परराष्ट्र सचिवांना केला फोन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5359/feed 0
काँग्रेस ५७ शहरांत घेणार पत्रकार परिषदा https://janswarashtra.com/archives/5324 https://janswarashtra.com/archives/5324#respond Mon, 21 Apr 2025 11:34:46 +0000 https://janswarashtra.com/?p=5324 नॅशनल हेराल्ड केस प्रकरण; ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहिमेंतर्गत पृथ्वीराज चव्हाणांची बेळगावात पत्रकार परिषद कराड/प्रतिनिधी  : – नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा घेण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. विशेष मोहीम ... Read more

The post काँग्रेस ५७ शहरांत घेणार पत्रकार परिषदा first appeared on Jan Swarashtra.

]]>
नॅशनल हेराल्ड केस प्रकरण; ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहिमेंतर्गत पृथ्वीराज चव्हाणांची बेळगावात पत्रकार परिषद

कराड/प्रतिनिधी  : –

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा घेण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

विशेष मोहीम : ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. या काळात भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.

या नेत्यांचा समावेश : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून 57 नेत्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सिंग सुरजेवाला, राजीव शुक्ला, अलका लांबा अशा अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

२३ एप्रिलला पत्रकार परिषद : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बेळगांव येथे २३ एप्रिल रोजी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी, बेळगाव येथे पत्रकार परिषद होणार आहे.

बैठकीत निर्णय : १९ एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि आघाडीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीत देशभरात पत्रकार परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

The post काँग्रेस ५७ शहरांत घेणार पत्रकार परिषदा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5324/feed 0
आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर उलगडणार धावपटू जीवनाचा प्रवास https://janswarashtra.com/archives/5116 https://janswarashtra.com/archives/5116#respond Thu, 10 Apr 2025 07:43:55 +0000 https://janswarashtra.com/?p=5116 आशिष कासोदेकरांचा विशेष गौरव; कराड रोटरी अवॉर्ड सोहळ्याचे शनिवारी आयोजन  कराड/प्रतिनिधी : – रोटरी क्लब कराड आयोजित कराड रोटरी अवॉर्ड निमित्त शनिवार (दि. 12) रोजी यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या सोहळ्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड फेम, आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर हे आपल्या धावपटू जीवनाचा प्रवास उलगडणार असल्याची माहिती ... Read more

The post आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर उलगडणार धावपटू जीवनाचा प्रवास first appeared on Jan Swarashtra.

]]>
आशिष कासोदेकरांचा विशेष गौरव; कराड रोटरी अवॉर्ड सोहळ्याचे शनिवारी आयोजन 

कराड/प्रतिनिधी : –

रोटरी क्लब कराड आयोजित कराड रोटरी अवॉर्ड निमित्त शनिवार (दि. 12) रोजी यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या सोहळ्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड फेम, आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर हे आपल्या धावपटू जीवनाचा प्रवास उलगडणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कराड अध्यक्ष रामचंद्र लाखोले व सचिव आनंदा थोरात यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनरचा सन्मान : रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कराड रोटरी अवॉर्ड आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांचा विशेष सन्मान होणार आहे.

सलग ६० दिवसांत ६० मॅरेथॉन : या प्रेरणादायी व्होकेशनल अवॉर्ड गौरव समारंभात आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांचा गौरव झाल्यानंतर मराठी माणसाची आंतरराष्ट्रीय धाव समजून घेता येणार आहे. मॅरेथॉनमध्ये त्यांची विशेष कामगिरी आहे. सलग ६० दिवसांत ६० मॅरेथॉन – गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लडाख ५५५ किमी – ५ दिवसांत, ब्राझील २१७ किमी – ४४ तासांत, केरळ ते लडाख – ४००५ किमी (७६ दिवसांत), माउंट एव्हरेस्ट ६० किमी मॅरेथॉन अशा अनेक थक्क करणाऱ्या कामगिरीचा साक्षात प्रेरणादायी प्रवास ऐकता येणार आहे.

रोटरी अवॉर्ड वितरण : या कार्यक्रमात कराड रोटरी अवॉर्ड पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रात किशोर कुंभार, क्रीडा क्षेत्रातील राजवर्धन पाटील, पर्यावरण क्षेत्रातील इंद्रजीत निकम, सामाजिक कार्य क्षेत्रात शिवाजी डुबल (राजमाची), सामाजिक संस्था क्षेत्रात आपले कराड ग्रुप, अभिनय क्षेत्रातील आदित्य भोसले (गोवारे), कृषी क्षेत्रातील कृष्णतराव गुरव (घारेवाडी), कला क्षेत्रात बाबा पवार (विंग) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

आवाहन : या सन्मान सोहळ्यास सर्वांनी आणि विशेषतः खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने व्होकेशनल डायरेक्टर अभय नांगरे ‎यांनी केले आहे.

The post आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर उलगडणार धावपटू जीवनाचा प्रवास first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5116/feed 0
‘इस्रो’ कराडच्या विद्यार्थ्यांना घडवणार अंतराळाची सफर https://janswarashtra.com/archives/3959 https://janswarashtra.com/archives/3959#respond Wed, 15 Jan 2025 04:03:01 +0000 https://janswarashtra.com/?p=3959 सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात शनिवारी येणार इस्रोची बस  कराड/प्रतिनिधी : – लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. त्याची वैज्ञानिक माहिती घेऊन अंतराळात सफारीचा अनुभव घेण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेने ‘इस्रो’ मोहीम हाती घेतली त्यांतर्गत येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थांना ‘इस्रो’ अंतराळाची सफर घडवणार आहे. अंतराळाची ... Read more

The post ‘इस्रो’ कराडच्या विद्यार्थ्यांना घडवणार अंतराळाची सफर first appeared on Jan Swarashtra.

]]>
सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात शनिवारी येणार इस्रोची बस 

कराड/प्रतिनिधी : –

लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. त्याची वैज्ञानिक माहिती घेऊन अंतराळात सफारीचा अनुभव घेण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेने ‘इस्रो’ मोहीम हाती घेतली त्यांतर्गत येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थांना ‘इस्रो’ अंतराळाची सफर घडवणार आहे.

अंतराळाची मिळणार वैज्ञानिक माहिती : केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘इस्रो’ने यासाठी एक बस तयार केली असून विद्यार्थ्यांना बसच्या माध्यमातून गृह, तारे पाहण्याची, त्यांची अनुभूती घेत अंतराळाची वैज्ञानिक माहिती घेता येणार आहे. शनिवार (दि. १८) रोजी या बसचे सगाम महाविद्यालयात आगमन होणार आहे. अंतराळातील घडामोडींची माहिती व खगोल विज्ञानाची गोडी निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना यामुळे मिळणार आहे. या बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रह व ताऱ्यांची वैज्ञानिक माहिती घेता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाची गोडी निर्माण होईल.

शाळा महाविद्यालयांनी सहभागी व्हावे : महाराष्ट्रभर फिरणाऱ्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे संधी सगाम महाविद्यालयाला प्राप्त झाली आहे. शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या बसची विद्यार्थ्यांना सफर घडणार आहे. तरी कराड आणि परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी व शाळांनी सहभाग घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले आहे.

The post ‘इस्रो’ कराडच्या विद्यार्थ्यांना घडवणार अंतराळाची सफर first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/3959/feed 0
आर्थिक सुधारणावादी हरपला https://janswarashtra.com/archives/3706 https://janswarashtra.com/archives/3706#respond Sat, 28 Dec 2024 08:44:15 +0000 https://janswarashtra.com/?p=3706 समीक्षा…  व्यक्ती आणि विचार :  मनमोहन सिंग यांच्यासारखा जागतिक अर्थतज्ञ राजकारणात अनावधानाने आला असे वाटते. परंतु राजकारण आणि देशाचे आर्थिक नियोजन हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग हे राजकारणात आले ते बरेच झाले. त्यांच्या या निर्णयाचा देशाला अनेकवेळा फायदा झाला. त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांवर सध्या देशाचा कारभार सुरु आहे. मनमोहन सिंग हे मितभाषी असले ... Read more

The post आर्थिक सुधारणावादी हरपला first appeared on Jan Swarashtra.

]]>

समीक्षा… 

व्यक्ती आणि विचार

मनमोहन सिंग यांच्यासारखा जागतिक अर्थतज्ञ राजकारणात अनावधानाने आला असे वाटते. परंतु राजकारण आणि देशाचे आर्थिक नियोजन हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग हे राजकारणात आले ते बरेच झाले. त्यांच्या या निर्णयाचा देशाला अनेकवेळा फायदा झाला. त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांवर सध्या देशाचा कारभार सुरु आहे. मनमोहन सिंग हे मितभाषी असले तरी त्यांच्या आर्थिक व राजकीय धोरणांचा प्रभाव अजूनही भारतावर आहे. त्यांच्या नव्या आर्थिक धोरणांमुळे भारताची दखल सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येते, हे देशवासीयांवरील ऋण फिटणार नाहीत.

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसमधील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. एक अर्थतज्ञ ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास भारतीय राजकारणात महत्वाचा ठरला आहे. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी बुद्धिमत्ता पणाला लावत देशाला सावरले. मन मोहन सिंग हे मितभाषी होते. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली. परंतु, भारतात जागतिकीकरणाचे नवे पर्व त्यांनी सुरु केले आहे. आज जो भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, याचे श्रेय नि:संशय मन मोहन सिंग यांना जाते. उच्चशिक्षित आणि संयमी राजकारणी आणि मुत्सद्दी अर्थतज्ञ अशी भूमिका त्यांनी पार पाडली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर अशी भूमिका त्यांनी 1982 साली निभावली होती. भारताच्या आर्थिक हालाखीच्या काळात आपल्या कौशल्याने देशाला सावरण्यात त्यांचा होत होता. मन मोहन सिंग हे भारताच्या पंतप्रधानपदी दोनवेळा राहिले. परंतु, सिंग हे पंतप्रधानपदी असताना कॉंग्रेसमधील राजकारणामुळे अनेकवेळा योग्य निर्णय घेता आला नाही ही खंत आहे. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असताना तत्कालीन कॉंग्रेसने त्यांच्या गुणात्मक क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेतला नाही हे सत्य होय. 1971 पासून मन मोहन सिंग यांनी केंद्र सरकारला अर्थतज्ञ म्हणून सहकार्य केले आणि विविध पदे भूषविली. 2014 साली जेव्हा तत्कालीन माध्यमे पंतप्रधान मन मोहन सिंग यांच्यावर कमकुवत पंतप्रधान म्हणून टीका करत होती, तेव्हा मनमोहन सिंग व्यक्त होत म्हणाले होते की, माध्यमांपेक्षा इतिहासच मला न्याय देईल. कारण आपण राबवलेली आर्थिक धोरणे देशाला सावरतील, याचे सिंग यांना खात्री होती. भारतात बुद्धिमत्तेपेक्षा राजकारणाला जास्त वाव दिला जातो. मोठ्या आवाजात बोलून काही नेते जनतेला आकर्षित करतात, प्रभाव टाकतात. परंतु, मनमोहन सिंग हे मितभाषी असल्याने राजकारणात त्यांचे नाणे वाजले नाही. नेता बोलघेवडा असण्यापेक्षा धोरणी, मुत्सद्दी असावा, असे मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिल्यावर वाटते. सिंग यांच्या निधनाने देशाचा आर्थिक दिशादर्शक हरपला आहे.

मनमोहन सिंग हे उच्चशिक्षित होते. त्यांनी 1952 साली पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र विषय घेऊन स्नातकोत्तर पदवी घेतली. त्यांना 1954 साली  सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी राइट्स पुरस्कार मिळाला. 1957 साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली.  त्यावेळी भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेवर पीएचडी प्रबंध लिहिला होता. मनमोहन सिंग हे 1971-72 दरम्यान परकीय व्यापार मंत्रालयातील आर्थिक सल्लागार होते. 1972-76 दरम्यान ते वित्त मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागारपदी होते. 1976-80 दरम्यान त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक तसेच इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे संचालकपद भूषवले. 1982 साली आशियाई विकास बँकेच्या गव्हर्नर मंडळावर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर होते.  नोव्हेंबर 1976 एप्रिल 1980 दरम्यान  त्यांनी वित्त मंत्रालय (आर्थिक व्यवहार विभाग) मध्ये सचिवपद सांभाळले. तसेच अणुऊर्जा आयोगाचे सदस्य, अंतराळ आयोगाचे वित्त सदस्य, नियोजन आयोगाचे सदस्य-सचिव, भारत-जपान संयुक्त अभ्यास समितीच्या भारतीय समितीचे अध्यक्ष अशी पदे भूषवली. 16 सप्टेंबर 1982-84 जानेवारी 1985 दरम्यान मनमोहन सिंग यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. 1982-85 दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर म्हणून काम पाहिले. 1983-84 दरम्यान त्यांनी  पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. सिंग यांनी भारतीय आर्थिक समितीचे अध्यक्षपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, सरचिटणीस आणि दक्षिण आयोगाचे आयुक्त, जिनिव्हा, पंतप्रधानांचे आर्थिक बाबींचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदे भूषवली. अर्थात सिंग हे जागतिक स्तरावरील अर्थतज्ञ असल्याने त्यांनी ही पदे कौशल्याने भूषवली आणि पदांना न्याय दिला.

मनमोहन सिंग यांच्यासारखा जागतिक अर्थतज्ञ राजकारणात अनावधानाने आला असे वाटते. परंतु, राजकारण आणि देशाचे आर्थिक नियोजन हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग हे राजकारणात आले ते बरेच झाले. त्यांच्या या निर्णयाचा देशाला अनेकवेळा फायदा झाला. त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांवर सध्या देशाचा कारभार सुरु आहे. 1991-96 दरम्यान त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पद भूषवले. ऑक्टोबर 1991 साली ते आसाममधून काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले. जून 1995 मध्ये ते राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. 1996 पासून ते अर्थ मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. 1996-67 दरम्यान वाणिज्य संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 1998 साली राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका निभावली. जून 2001 मध्ये ते राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. 2004-14 दरम्यान मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. 2024 मध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले. मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द लक्ष्यवेधी होती. परंतु, त्यांच्यावर पंतप्रधानपदी असताना मौनी पंतप्रधान म्हणून टीका झाली. मनमोहन सिंग हे मितभाषी असले तरी त्यांच्या आर्थिक व राजकीय धोरणांचा प्रभाव अजूनही भारतावर आहे. त्यांच्या नव्या आर्थिक धोरणांमुळे भारताची दखल सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येते, हे देशवासीयांवरील ऋण फिटणार नाहीत.

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी रात्री 9.51 वाजता निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. अचानक प्रकृती बिघडल्याने गुरुवारी त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मनमोहन सिंग यांना फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. या श्वसनाच्या आजारामुळे गुरुवारी त्यांचे निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मनमोहन सिंग यांना वयोमानानुसार इतर काही आजार होते. त्यांना विस्मरणाचा त्रास होत होता, तसेच दीर्घकाळापासून ते श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला सकारात्मक दिशा देणारा अर्थतज्ञ – सभ्य राजकारणी हरपला आहे, असेच म्हणावे लागेल.

– अशोक सुतार / 8600316798 

(लेखक विचारवंत, पत्रकार आणि व्यंगचित्रकार आहेत)

The post आर्थिक सुधारणावादी हरपला first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/3706/feed 0
डॉ. मनमोहनसिंग यांचा कार्यकाळ सुवर्णकाळच https://janswarashtra.com/archives/3672 https://janswarashtra.com/archives/3672#respond Fri, 27 Dec 2024 12:52:09 +0000 https://janswarashtra.com/?p=3672 पृथ्वीराज चव्हाण; त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी  कराड/प्रतिनिधी : –  भारताचे माजी पंतप्रधान, जगविख्यात अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कालखंडात अनेक लोकांभिमुख कायदे केले होते. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील तो 10 वर्षांचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल, असे मत पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री ... Read more

The post डॉ. मनमोहनसिंग यांचा कार्यकाळ सुवर्णकाळच first appeared on Jan Swarashtra.

]]>

पृथ्वीराज चव्हाण; त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी 

कराड/प्रतिनिधी : – 

भारताचे माजी पंतप्रधान, जगविख्यात अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कालखंडात अनेक लोकांभिमुख कायदे केले होते. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील तो 10 वर्षांचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल, असे मत पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

शोकसंदेश व आठवणी : थोर अर्थतज्ञ आणि देशाची माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गुरुवारी रात्री वयाच्या 92 व्या वर्षी अखिल भारतीय आयुर्वि‌ज्ञान संस्थेमध्ये (एम्स) अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, म्हणून उल्लेखनीय काम केलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला असून त्यांच्या काही आठवणींनाही उजाळा दिला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत तत्कालीन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मान्यवर.

डॉ. मनमोहनसिंग राजकारणी नव्हते : डॉ. मनमोहनसिंग यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे अत्यंत जवळून काम केल्याची आठवण सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहनसिंग हे अत्यंत उच्चशिक्षित होते. तसेच ते मोठे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. पण याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. ते राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. परंतु, ते राजकारणी नव्हते, असं म्हटले जाते. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधान असे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड नम्रता होती, हे मी अगदी जवळून पाहिले आहे. 

जागतिक मंदीतही देशाला झळ बसली नाही : सन 2008 च्या जागतिक मंदीच्या काळामध्ये मनमोहनसिंग यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगत श्री. चव्हाण यांनी त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची त्यांनी आपल्या देशाला झळ बसू दिली नाही, असे मत नमूद केले आहे.

अनेक लोकांभिमुख कायद्यांचे निर्माते : डॉ. मनमोहनसिंग यांनी अनेक महत्वाचे कायदे निर्माण केल्याचे सांगताना श्री चव्हाण म्हणाले, मनरेगा सारखा कामाच्या अधिकाराचा कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, शिक्षण हक्काचा कायदा (Right to Education), वनाधिकार कायदा असे अनेक लोकांभिमुख कायदे डॉ. मनमोहनसिंग यांच्या कालखंडात त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील तो 10 वर्षांचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल, असे मत व्यक्त करत अशा महान नेत्यास श्री. चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  

The post डॉ. मनमोहनसिंग यांचा कार्यकाळ सुवर्णकाळच first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/3672/feed 0