कराडमध्ये गुरुवारी नवरात्रोत्सवी सामुदायिक भोंडला कार्यक्रमाचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत महिलांसाठी सामुदायिक भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेळ व ठिकाण : गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत भाजी-मंडई येथील गोरक्षण संस्थेत हा कार्यक्रम रंगणार आहे.

सांस्कृतिक स्पर्धा व बक्षिसे : या कार्यक्रमात महिलांसाठी उखाणे, लकी ड्रॉ, तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले असून, विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. भोंडला हा विस्मृतीत चाललेला पारंपरिक खेळ नव्या पिढीला परिचित करून त्याचे संवर्धन व्हावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आवाहन : गोरक्षण संस्था ट्रस्टच्यावतीने सौ. संगीता पवार, विश्वस्त सौ. ज्योती दंडवते व व्यवस्थापिका श्रीमती गीता सुर्यवंशी यांनी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!