डॉ. सुरेश भोसले यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस मलकापूर (कराड) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते डॉ. भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमात राज्याचे माजी क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. पाटील यांच्या हस्ते डॉ. भोसले यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मोलाचे योगदान : “सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी रुजवलेल्या सहकाराच्या मूल्यांना डॉ. सुरेश भोसले यांनी नवा विस्तार दिला. शेती, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे सांगत श्रीनिवास पाटील म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा सर्जन म्हणून असलेला नावलौकिक आणि समाजातील माणसांशी असलेला आत्मीय संबंध हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.” 

स्नेह, विश्वास आणि प्रेमामुळे मिळते प्रेरणा : डॉ. सुरेश भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानत, “हा स्नेह, विश्वास आणि प्रेम यामुळेच मला समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते,” असे उद्गार काढले.

प्रमुख उपस्थिती : या कार्यक्रमास कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते, पृथ्वीराज भोसले, सौ. उत्तरा भोसले, सुवर्णादेवी देशमुख, डॉ. सविता मोहिते, श्री. विनायक भोसले, सुदन मोहिते, डॉ. अशोक गुजर, सी. बी. पाटील, सारंग पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष पै. भगवानराव पाटील, दादासाहेब पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह कृष्णा परिवारातील सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुरेशबाबा शतायुषी व्हा!

आपल्या भाषणात बोलताना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस आहे. आणि तारीख ३० आहे. त्यामुळे ७० आणि ३० मिळून १०० होतात. त्यामुळे डॉ. सुरेशबाबा शतायुषी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत डॉ. सुरेशबाबांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!