कराड/प्रतिनिधी : –
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीसाठी माजी सहकार व पणन मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील सोमवार (दि. ३) रोजी सकाळी ११ वाजता व्यक्तिश: नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
जाहीर सभेची वेळ व दिनांक कळविणार : बुधवार (दि. ५) नंतर पी. डी. पाटील पॅनलच्या पहिल्या जाहीर सभेची दिनांक, वेळ व ठिकाण सर्व सभासद शेतकरी बंधू-भगिनींना कळविली जाईल, अशी माहिती पी. डी. पाटील पॅनलच्या वतीने देण्यात आली.
