कृषी पदवीधर विद्यार्थी आज सनदी अधिकारी, बँक अधिकारी, कृषी उद्योजक व प्रगतशील शेतकरी होत आहेत. पुर्वीच्या शिक्षण पध्दतीत बदल झाला असून आज आधुनिक पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपल्या या कृषी महाविद्यालयाला कृषी विद्यापीठ करण्याचा आमचा मानस आहे. असे प्रतिपादन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे,बाजीराव निकम, सयाजी यादव, जे डी मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, मनोज पाटील, वैभव जाखले, कृष्णा कृषी विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, माजी प स सदस्य बाळासाहेब निकम, वडगाव हवेलीचे सरपंच राजेंद्र जगताप, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, सुजित मोरे, ब्रिजराज मोहिते, जयवंत नांगरे, धोंडीराम कदम, धनंजय पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे आदी उपस्थित होते.
‘कृषी’च्या विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य : आज कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थी सर्व क्षेत्रात कार्यरत असलेले दिसतात, या शाखेला व कृषी विद्यार्थ्यांना भविष्य असल्याचे सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, कृषी शाखेचे शिक्षण घेतल्यास शंभर टक्के नोकरी मिळू शकते असा विश्वास आहे. विद्यार्थ्यांचाही कल कृषी शिक्षणाकडे आहे. या महाविद्यालयाला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आ. डॉ.अतुलबाबा भोसले यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कृषी महाविद्यालय स्थापनेचा उद्देश : भागातील मुलांना कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आल्याचे संगत डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आज सर्व सुविधा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून आपले करिअर बनवावे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करून शेतकर्यांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा.
यशवंतांचा गुणगौरव : प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा प्रकारांमध्ये, विद्यापीठ स्तरावर विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व आभार : प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजित पवार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. सारंग कुंभार यांनी आभार मानले.
उपस्थिती : प्रा. जी. के. मोहिते व प्रा. अमोल मंडले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वयंचलित कृषी हवामान केंद्राचे उदघाटन
फुले स्मार्ट या स्वयंचलित कृषी हवामान केंद्राचे आणि महाविद्यालयातील बहुउद्देशीय हॉलचे उदघाटन आ.डॉ. अतुलबाबा भोसले व चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्वयंचलित हवामान केंद्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कृषी अभियांत्रिकी विभागाकडून महाविद्यालयास मिळाले आहे. भविष्यात या केंद्राचा कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.