पद्मराज वेळापुरे यांचे निधन 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

श्री. कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराडचे संस्थापक सदस्य व श्री. गणेश मंडळ, कासारगल्ली, कराडचे ज्येष्ठ मार्गदर्शक पद्मराज बापूराव वेळापुरे (वय ९२) यांचे अल्पशा आजाराने शनिवार (दि. १) मार्च २०२५ रोजी सायंकाळी निधन झाले.

विवेक वेळापुरे यांना पितृषोक : पद्मराज वेळापुरे हे श्री. कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराडचे व्यवस्थापक विवेक वेळापुरे यांचे वडील होत. 

श्रद्धांजली व सांत्वन : पद्मराज वेळापुरे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असून अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच विवेक वेळापुरे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

मनमिळावू व्यक्तिमत्व : पद्मराज वेळापुरे हे शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन विधी : रक्षाविसर्जन विधी सोमवार (दि. ३) मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता कराड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत होणार आहे. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!