स्वातंत्र्यवीर सावरकर वृतस्थ देशभक्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

एकनाथ बागडी; पुण्यतिथीनिमित्त स्मारक समिती व कराड शहर भाजपच्या वतीने अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान आले. ते एक कडवे व वृतस्थ देशभक्त होते. युवा पिढीने त्यांच्या आचरणाचा आणि विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान द्यावे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी केले.

अभिवादन : बुधवार (दि. २६) रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 59 वी पुण्यतिथीनिमित्त येथील त्यांच्या पुतळ्यास सावरकर स्मारक समिती आणि कराड शहर भाजपच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष व्ही. के. जोशी, आनंद पेंढारकर, अवधूत कुलकर्णी, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष सोपान तावरे, अभिजीत घाटगे, सातारा जिल्हा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बापू जंत्रे, बीबीएनजीचे सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी, उद्योजक शशांक शेंडे, व्यापारी इनामदार आणि इतर सावरकर प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!