कराडमध्ये भाजप विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सुदर्शन पाटसकर यांची माहिती; नागरिकांना विविध प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांच्या नूतन विकासपर्व कार्यालयाचे उद्घाटन शनिवार (दि. १) रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सुदर्शन पाटसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

अंतिम घटकाला विकास प्रवाहात आणणार : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय या सिद्धांतानुसार समाजातील अंतिम घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवत असल्याचे सुदर्शन पाटसकर यांनी म्हटले आहे. 

सेवा व्रताचा विस्तार : २०१५ साली भाजयुमो कराड शहराध्यक्ष झाल्यापासून सुरू केलेल्या सेवा व्रताचा विस्तार करत असल्याचे सांगत श्री पाटसकर यांनी शहराध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीस या प्रवासात आपल्या कार्यालयाचे माध्यमातून कराड शहरातील नागरिकांना आजवर विविध प्रकारची मदत, शासकीय योजनांची माहिती व लाभ पोहचला असून या विस्तारित कार्यालयाच्या माध्यमातून या सेवा कार्याची व्याप्ती वाढून कराडवासीयांना या कार्यालयाचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

उद्घाटन : शनिवार, दि. १ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वरदविनायक संकुल, लाहोटी कन्याशाळेशेजारी, गुरुवार पेठे, कराड येथे विकासपर्व कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास खा. छत्रपती उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, विधान परिषद आ. विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटसकर, सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती श्री पाटसकर यांनी सदर पत्रकाद्वारे दिली आहे. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!