कराड दक्षिण काँग्रेसचा संवाद मेळावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती; सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची साधणार संवाद 

कराड/प्रतिनिधी : –

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी “कार्यकर्ता संवाद मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.

मार्गदर्शन : या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा), तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील – उंडाळकर संवाद साधणार आहेत.

वेळ व ठिकाण : हा मेळावा बुधवार, दि. 18 रोजी आनंद मल्टीपर्पज हॉल, पाचवडेश्वर ता. कराड येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

आवाहन : या मेळाव्यास कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच कराड दक्षिण महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस, मलकापूर शहर काँग्रेस, अनुसूचित जाती, अल्पसंख्यांक विभाग, सेवादल, तसेच सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!